• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • जाळं टाकलं अन् पालघरच्या मच्छिमाराचं नशिब पालटलं; हाती आलेल्या त्या माशांनी बनवलं कोट्यधीश

जाळं टाकलं अन् पालघरच्या मच्छिमाराचं नशिब पालटलं; हाती आलेल्या त्या माशांनी बनवलं कोट्यधीश

मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचं एका रात्रीत नशिब पालटलं आहेत.

मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचं एका रात्रीत नशिब पालटलं आहेत.

एखादा मच्छिमार एका रात्रीत मासे विकून करोडपती होऊ शकतो, याची कल्पनाही करवत नाही. पण पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील मच्छिमाराच्या बाबतीत मात्र असं घडलं आहे. मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचं एका रात्रीत नशिब पालटलं आहेत.

 • Share this:
  पालघर, 31 ऑगस्ट: एखादा मच्छिमार एका रात्रीत मासे विकून करोडपती होऊ शकतो, याची कल्पनाही करवत नाही. पण पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील मच्छिमाराच्या बाबतीत मात्र असं घडलं आहे. मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचं एका रात्रीत नशिब पालटलं आहेत. त्यांच्या जाळ्यात घोळ जातीचे दुर्मिळ मासे अडकल्यानं ते एका रात्रीत मालामाल झाले आहेत. सोमवारी या दुर्मिळ घोळ मांशाचा लिलाव करण्यात आला आहे. या माशांना व्यापाऱ्यांकडून तब्बल दीड कोटींची बोली लावण्यात आली होती. त्यामुळे मच्छिमार चंद्रकात तरे हे एका रात्रीत करोड पती झाले आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? पालघर जिल्ह्यातील मुरबे गावातील रहिवासी असणारे चंद्रकात करे आपल्या मालकीची हरबा देवी बोट घेऊन समुद्रात जवळपास 15 मैल दूर अंतरावर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत काही हौसी तरुणही गेले होते. यावेळी करे यांनी मासेमारी करण्यासाठी वागरा पद्धतीनं जाळ समुद्रात फेकलं. काही वेळातच जाळ जड लागायला सुरुवात झाली. यामुळे करे यांनी जाळं बोटीत ओढून घेतलं. यावेळी घडलेला चमत्कार पाहून त्यांचाही डोळ्यावर विश्वास बसला नाही. कारण त्यांच्या जाळ्यात दीडशेहून अधिक घोळ जातीचे दुर्मिळ मासे अडकले होते. या जातीचा एका माशासाठी बाजारात हजारो रुपये मोजले जातात. हेही वाचा-सुपरटेकच्या 40 मजली दोन्ही इमारती पाडण्याचा SCचा आदेश; खरेदीदारांचं काय होणार? एबीपीनं दिलेल्या वृत्तानुसार, घोळ माशांच्या पोटातील पिशवीला (बोत) खूप जास्त महत्त्व असून याचा वापर वैद्यकिय उपचारासाठी केला जातो. तरे यांना सापडलेल्या माशांचं अंदाजे वजन 18 ते 25 किलो दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे. या माशांच्या पोटात तब्बल 1 कोटी 26 लाख रुपये किंमतीचे बोत आढळले आहेत. त्यामुळे मच्छिमार तेरे यांना बोत आणि माशांची एकत्रित दीड कोटीहून अधिक रक्कम मिळणार आहे. हेही वाचा-सोनं तस्करीसाठी तरुणाची अनोखी शक्कल; जीन्सचा कलर पाहून पोलिसही हैराण घोळ हा विशिष्ट जातीचा मासा असून खूप कमी प्रमाणात आढळतो. हा मासा चवीला तर स्वादिष्ट आहेच. पण त्याचे वैद्यकीय गुणधर्म अनेक आहेत. त्यामुळे या माशांना बाजारात खूप जास्त मागणी आहे.  सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकांग या देशात या माशांची निर्यात केली जाते. या माशाला 'सोने का दिल वाली मछली' असंही म्हटलं जातं. घोळ माशाच्या सर्वात लहान माशाची किंमत देखील 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत असते.
  Published by:News18 Desk
  First published: