नाशिकमध्ये दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये, महापालिकेच्या सर्व्हेत उघड झाली माहिती

नाशिकमध्ये दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये, महापालिकेच्या सर्व्हेत उघड झाली माहिती

शहरातील दीड लाख नागरीक चक्क हाय रिस्क झोनमध्ये असल्याचं उघड झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे.

  • Share this:

नाशिक, 29 सप्टेंबर : राज्यातील विविध शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. अशातच नाशिक शहरातून नवी माहिती समोर आली आहे. शहरात कोरोनाची दाहकता कायम असून मनपाच्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडे समोर आले आहेत. शहरातील दीड लाख नागरिक चक्क हाय रिस्क झोनमध्ये असल्याचं उघड झाल्यानं मोठी खळबळ माजली आहे.

एकीकडे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमासाठी पालिकेनं कंबर कसली आहे, तर दुसरीकडे कोरोनाचं तांडव सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. शहरात कोरोनाबाबत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत रिस्क आहे. तब्बल साडेतीन लाख नागरिक बाधितांच्या संपर्कात आल्याचं उघड झालं आहे. यात,1 लाख 48 हजार हाय रिस्क तर 1 लाख 99 हजार लो असल्याची नोंद आहे. अशी परिस्थिती असताना हे सर्वेक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना चक्क आंदोलन करावं लागत आहे, अशी स्थिती आहे.

खरंतर कोरोना बाधितांनी शहरात 50 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. मात्र तब्बल 46 हजार रुग्ण बरे झाल्यानं मोठा दिलासा मानला जात आहे. जवळपास 200 टीम्सच्या माध्यमातून मिशन झिरो प्रोजेक्टची अंमलबजावणी केली जात असली तरी जोपर्यंत नागरिक स्वतःहून याला गांभीर्यानं घेत नाही,तोपर्यंत हाय रिस्क ही लो रिस्क होणार नाही हे स्पष्ट आहे.

दरम्यान, देशात येत्या काही दिवसांत सण, लोकांचं एकत्र येणं आणि हिवाळा या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: September 29, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या