मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लाव रे तो व्हिडिओ! पूल दुर्घटनेवरून नानांचा मोदींवर निशाणा, तो फोटोही दाखवला!

लाव रे तो व्हिडिओ! पूल दुर्घटनेवरून नानांचा मोदींवर निशाणा, तो फोटोही दाखवला!

गुजरातच्या मोरबीमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेत 134 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Shreyas

शेगाव, 1 नोव्हेंबर : गुजरातच्या मोरबीमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेत 134 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 100 वर्षांपेक्षा जास्त जुना असलेला या पुलाचं रिनोव्हेशन काहीच दिवसांपूर्वी झालं होतं, पण रविवारी हा पूल कोसळला. याप्रकरणी विरोधकांकडून गुजरात सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पूल दुर्घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

'गुजरातमधील पूल अपघाताबाबत नाना पटोले यांनी शंका उपस्थित केली. तसंच नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींचं जुनं भाषण ऐकवलं. एवढच नाही तर तो पूल ज्या कॉन्ट्रॅक्टरने बांधला त्याच्यासोबत मोदींचा फोटो असल्याचं नाना पटोले यांनी दाखवलं. पूल बांधणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अतिशय जवळची असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला.

तारीख पे तारीख

दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटाचा फैसला आज होणार होता, मात्र पुन्हा आज न्यायालयाकडून पुढची तारीख देण्यात आली, त्यावर तारीख पे तारीख लोकशाहीसाठी घातक असल्याची खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली.

राज्यातील अस्थिर परिस्थिती राज्यपालांना सांगितली आणि राज्यातील सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही राज्यपालांना भेटून केली, असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले हे आज बुलढाण्याच्या शेगाव दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर फटकेबाजी केली.

First published:

Tags: Nana Patole, PM narendra modi