Home /News /maharashtra /

दरमहा 1 लाख 10 हजारांचा सुरू होता हप्ता; महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकारी अटकेत

दरमहा 1 लाख 10 हजारांचा सुरू होता हप्ता; महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकारी अटकेत

Revenue Department official arrested in Osmanabad for taking bribe: लाच घेताना उस्मानाबादमधील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकरसह एकाला अटक करण्यात आली आहे.

    बालाजी निरफळ, प्रतिनिधी उस्मानाबाद, 28 जुलै : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा वसुली करण्याचे आपल्याला आदेश दिले होते असा खळबळजनक आरोप केला होता. हे प्रकरण ताजे असताना आता उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये दरमहा लाख रुपयांचा हप्ता सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाच हप्ता घेताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला (Manisha Rashinkar) अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एकाला मंगळवारी लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) अटक केली आहे. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा मासा जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे. Osmanabad: अधिकारी होताच विसरला गरीबी; 40 हजारांची लाच घेताना तरुणाला रंगेहाथ अटक भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास 1 लाख 10 हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितली होती. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसींग जानकर यांना अटक करण्यात आली आहे. 1 लाख 10 हजारांची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार आणि 20 हजार आरोपी जानकर याच्या हस्ते स्विकारले. तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद यांनी ही कारवाई केली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Osmanabad

    पुढील बातम्या