हुश्श...! आज मान्सूनची महाराष्ट्रातून Exit होणार

अतिशय वेगाने महाराष्ट्राबाहेर जात असून त्याचं राज्यात तब्बल महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी वास्तव्य लांबलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 11:15 AM IST

हुश्श...! आज मान्सूनची महाराष्ट्रातून Exit होणार

संदीप भुजबळ, मुंबई 16 ऑक्टोंबर :  गेली काही दिवस महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा मान्सून आज महाराष्ट्रातून परतणार आहे. मान्सूनच हे परत जाणं तब्बल एक महिन्याने लांबल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. सुरुवातीला थोडा रखडणारा मान्सूनने नंतर सर्व राज्यभर प्रचंड धुमाकूळ घातला. तर काही भागाकडे पाठ फिरवली. मात्र कोल्हापूर, पुणे आणि मुंबईत गेल्या काही दशकांमधला हा सर्वात जास्त पाऊस असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय. परणारा मान्सून अतिशय वेगाने महाराष्ट्राबाहेर जात असून जाताना तो बरसणार का? याकडे सगळ्यांत लक्ष लागलंय.मान्सून परतल्यानंतर ऑक्टोबर हिट भडकण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलीय. मंगळवारपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या बऱ्याच भागातून मान्सूनची एक्झिट झालीय.

राणेंच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार

तब्बल महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी मान्सूनचं वास्तव्य लांबलं होतं. गेल्याच आठवड्यात उत्तर भारतातून घेतली माघार घेतली होती. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा वेग कमालीचा जास्त असून आज संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून निरोप घेईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. मान्सून हा परवा परवा पर्यंत पुण्यात बरसत होता. कधी नव्हेते काही तासांच्या पावसाने पुणे जलमय झालं होतं. अनेक वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी भरलं. 14 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आणि कोट्यवधींची हानी झाली.

कोकणचं निसर्गसौंदर्य आणि गुराख्याच्या बसरीचे सूर, पाहा SPECIAL REPORT

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूराने तर सर्वच विक्रम मोडीत काढले. वर्षभरात होणारा पाऊस काही दिवसांमध्ये पडला आणि दोन जिल्हे पाण्यात बुडाले होते. हवामानाच्या बदलामुळे पावसाचा हा लहरीपणा वाढल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: monsoon
First Published: Oct 16, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...