मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यात कधीपर्यंत दाखल होणार मान्सून, कसं करावं पिकांचं नियोजन?

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यात कधीपर्यंत दाखल होणार मान्सून, कसं करावं पिकांचं नियोजन?

केरळमध्ये मान्सून (Monsoon has been Delayed) लांबणीवर पडल्याचं हवामान शास्त्र विभागानं म्हटलं. अशात राज्यात मान्सूनचं आगमन कधी होणार? राज्यातील मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडणार का ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घोंघावत आहेत

पुढे वाचा ...

मुंबई 01 जून : केरळमध्ये मान्सून (Monsoon has been Delayed) लांबणीवर पडल्याचं हवामान शास्त्र विभागानं म्हटलं. तर, स्कायमेटनं (SkyMate) केरळमध्ये मान्सून दाखल झालं असल्याचं सांगितलं. या दोन्ही संस्थांनी मांडलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे सामान्य जनता मात्र बुचकळ्यात पडली. अशात राज्यात मान्सूनचं आगमन कधी होणार? राज्यातील मान्सूनचं आगमनही लांबणीवर पडणार का ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घोंघावत आहेत. याच पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी न्यूज १८ लोकमतनं हवामान अभ्यासक उदय देवळाणकर यांच्यासोबत बातचीत केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला आहे.

पुढील दोन दिवस राज्यातील बहुतेक भागांमध्ये सरी कोसळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी का? तर याचं उत्तर नाही असं त्यांनी दिलं आहे. पेरणीयोग्य पाऊस राज्यात 10 जूनला येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, सध्या शेतकऱ्यांनी जमीन तयार करण्याच्या तयारीलाही लागू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

मान्सून केरळमध्ये उशिरा दाखल झाला असला तरी राज्यात वेळेवरच पाऊस येणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यासोबतच राज्यात २५ जूनपर्यंत बहुतेक पेरण्या आटोपलेल्या असतील, असंही त्यांनी सांगितलं. 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी सोयाबीन तसंच कापसाची पेरणी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. पेरणीसाठी कोणत्याही प्रकारची घाई न करता, आवश्यक असलेला ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असं ते म्हणाले.

मक्याला यंदा मागणी -

मक्याच्या बाजारभावाबद्दल बोलताना ते म्हणाले, की मागील वर्षी मक्याला अत्यंत कमी दर मिळाले. मात्र, यंदा उत्पादन कमी असल्यामुळे मागणी वाढून दरात तेजी येण्याची शक्यता आहे. मक्याला जास्त पाणी लागतं, त्यानुसार शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणं आवश्यक आहे. यंदाचा मान्सून साधारण असणार आहे. तर, मध्य महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंतच्या १२६ तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण नेहमीच कमी किंवा मध्यम असतं. या तालुक्यांमध्ये यंदाही हीच परिस्थिती राहील, असंही त्यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Monsoon, Weather update