Home /News /maharashtra /

Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे कर्नाटकच्या दिशेने; पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात धडकणार मान्सून

Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे कर्नाटकच्या दिशेने; पुढील 3 दिवसात महाराष्ट्रात धडकणार मान्सून

केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतचं नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या (Karnataka) दिशेने आगेकूच केली आहे. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात (Monsoon in Maharashtra) दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 04 जून: काल अखेर केरळात नैऋत्य मोसमी (Monsoon in Kerala) वाऱ्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे काल सकाळपासूनच केरळातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकच्या (Karnataka) दिशेने आगेकूच केली आहे. तर पुढील दोन तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात (In next 2-3 days monsoon will arrive in maharashtra) दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, लक्षद्विप आणि केरळातील उर्वरित भागासह  दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळाडूच्या  या भागांना व्यापलं आहे. बंगालच्या उपसागरातही मान्सून दाखल झाला आहे. दक्षिणेतील वाऱ्याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता. पण त्यानंतर आता मोसमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून अरबी समुद्रातील काही भागासह गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हे ही वाचा-भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरण्यामागं 'हे' होतं महत्त्वाचं कारण - WHO पुण्यासह या जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशारा एककीकडे राज्यात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होतं असताना, मागील काही दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसाने जोर धरला आहे. येत्या तीन ते चार तासांत पुण्यासह, बारामती, शिरूर, इंदापूर, रायगड, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि आसपासच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान याठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास इतका असेल. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Monsoon, Pune, Weather forecast, Weather update

    पुढील बातम्या