Home /News /maharashtra /

आसुसलेल्या मातीत बरसणार धारा... आजपासून 'या' विभागात पावसाचा जोर वाढणार : IMD

आसुसलेल्या मातीत बरसणार धारा... आजपासून 'या' विभागात पावसाचा जोर वाढणार : IMD

राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय (weather forecast) होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  मुंबई, 18 जून : राज्यात मान्सून (monsoon Update) दाखल झाल्यानंतरही पावसाने विशेष हजेरी लावली नसल्याने शेतीची कामं खोळंबली आहेत. तर दुसरीकडे अजूनही अनेक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. अशातच मान्सून राज्यात सक्रीय होताना दिसत असल्याने उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळणार आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकरीही खूश होईल अशी बातमी आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) नोंदवली आहे. आजपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर वाढणार मागच्या पंधरा दिवसांपासून मान्सून (monsoon) आला अशी माहिती हवामान विभागाकडून (imd alert) मिळत आहे. परंतु मान्सून सक्रिय जरी असला तरी महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra monsoon update) येण्यासाठी विलंब होत असल्याचे कारण पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सून थांबला आहे. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून सक्रिय होताना दिसत आहे. आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. तर दक्षिण कोकणात सोमवारपासून अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा यंदा मान्सूनला विलंब झाला असला तरी काही भागात मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांना याचा आधार मिळाला आहे. महाराष्ट्रातील काही भागात मान्सून सक्रिय असला तरी कमी दाबाचे पट्टे तयार होत नसल्याने बाष्पयुक्त ढगांच्या निर्मितीस खूप वेळ लागत आहे. त्यामुळे मान्सून राज्यात पाऊस पाडण्यात अपयशी ठरतो आहे. मात्र, 19 जूनपासून परिस्थितीत किंचित बदल होत असून, 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातून शुक्रवारी मान्सूनने गुजरात राज्यात प्रवेश केला. ऑरेंज अलर्ट रत्नागिरी : 20 ते 21 जून - सिंधुदुर्ग: 18 ते 21 जून यलो अलर्ट : 19 ते 21 जून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

  जून महिन्यात नाशिकवर पाणी कपातीचं संकट गडद; धरणांमध्ये केवळ 21 टक्के पाणीसाठा शिल्लक

  राज्यातील पाऊस (मिमीमध्ये) कोकण : वैभववाडी-50, खालापूर- 40, वालपोई-30, कणकवली-30, सावंतवाडी - 30, रत्नागिरी- 20, ठाणे - 10 विदर्भ : अकोला - 90, खामगाव - 50, चिखली - 40, बाळापूर - 30, तेल्हारा - 20, धामणगाव रेल्वे-20, नांदुरा-10, मराठवाडा : उदगीर - 40, जळकोट- 40, सोनपेठ-40, वडवणी - 30, अहमदपूर - 20, मानवत - 20, परळी वैजनाथ - 20, सेलू - 10, मध्य महाराष्ट्र : खाकरी-20, महाबळेश्वर-20 गुजरखेडा-20 घाटमाथा : लोणावळा, खोपोली, अंबोणे- 10
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: IMD FORECAST, Monsoon

  पुढील बातम्या