मुंबई, 26 जून: मान्सूनचं (Monsoon) आगमन झाल्यानंतर राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली होती. पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यानंतर आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा मान्सून दमदार हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तत्पूर्वी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावासाची शक्यता आहे. आज सकाळापासूनच राज्यात बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे पुढील दोन ते तीन तासांत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकण आणि घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्यात शांत झालेल्या मान्सूननं कमबॅक करण्याचे संकेत दिले आहेत. पण पुढील आणखी एक आठवडा राज्यात अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
14.30 Hrs, 26 Jun, ☔☔
Possibility of moderate thunderstorm associated with spells of rains, possible over Maharashtra as shown below next 2,3 hrs.
S Konkan too🌧🌩
Ghat areas also showing development.
Watch for nowcast being issued by IMD. pic.twitter.com/Vlyf7nR0yt
अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे 30 जून पर्यंत कोकणातील काही भागात मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जून अखेपर्यंत तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेच्या चक्रीय स्थितीमुळे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश या भागांमध्ये तसेच विदर्भाच्या काही भागांमध्ये 26 ते 30 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे.
हेही वाचा-पुण्यात Sputnik V लस दाखल; पुणेकरांना 'या' दिवसापासून घेता येणार लस
यासोबतच आज विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला. आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते अति हलक्या पावसाची शक्यता आहे. पण 28 जून रोजी विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.