• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Monsoon Update: उत्तर भारतात मान्सून मंदावला; राज्यात याठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

Monsoon Update: उत्तर भारतात मान्सून मंदावला; राज्यात याठिकाणी कोसळणार पावसाच्या सरी

Weather in Maharashtra: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नसल्यानं उत्तर भारतात मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली आहे.

 • Share this:
  पुणे, 23 जून: मागील काही दिवसांपासून राज्याला पावसानं विश्रांती दिली आहे. गेल्या आठवड्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि पुण्यातील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर, आता राज्यात मान्सून (Monsoon in Maharashtra) काहीसा सौम्य झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नसल्यानं उत्तर भारतात मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. मॉन्सूननं मंगळवारी फारशी प्रगती केली नसल्याचं हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून उत्तरेत मान्सूनचा प्रवास संथ गतीनं सुरू आहे. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि अनुकूल हवामान नसल्यानं मॉन्सूनची पुढची वाटचाल थांबली असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. मान्सूनने शनिवारी संपूर्ण अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश व्यापून, उत्तर प्रदेशचा बहुतांशी भाग आणि राजस्थानच्या काही भागात प्रगती केली होती. यानंतर आता राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब या राज्यांमध्ये मॉन्सूनची पुढील वाटचाल काहीशी संथ गतीनं होणार असल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मान्सूनचं आगमन झाल्यानंतर सलग दोन आठवडे राज्याला पावसानं झोपडून काढलं आहे. यानंतर आता पावसानं राज्यात आपला जोर कमी केला आहे. पुढील पाच दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हेही वाचा-कोरोनाला दीड वर्ष पूर्ण, जाणून घ्या सविस्तर आतापर्यंतचा रुग्णांचा आकडा तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आज विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केला आहे. आज विदर्भात अमरावती, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: