मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'अजितदादांना त्रास होणं स्वाभाविकच, कारण...' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

'अजितदादांना त्रास होणं स्वाभाविकच, कारण...' मुख्यमंत्र्यांचा पलटवार

पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद झाली.

पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद झाली.

पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद झाली.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 16 ऑगस्ट : उद्यापासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्रकार परिषद झाली. अजित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत अतिवृष्टी आणि कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर टीका केली. अजित पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांना त्रास होणं स्वाभाविकच आहे, कारण मागचं सरकार तर तेच चालवत होते, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. राज्याच्या इतिहासात एकही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती नसल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 'विरोधी पक्षाने त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे दाखवले. सात ते आठ पानांचं पत्र आहे. आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव आहे का काय? असं वाटलं. गेल्या दीड महिन्यात आम्ही जे निर्णय घेतले, त्यासाठी खंबीरपणा लागतो,' असं शिंदे म्हणाले. महत्त्वाची खाती भाजपकडे, मग शिवसेनेच्या खात्यांना किती निधी? फडणवीसांनी सांगितली आकडेवारी अतिवृष्टी झाली त्याचवेळी मी आणि देवेंद्र फडणवीस गडचिरोलीला गेलो, ज्या सूचना करायच्या त्या केल्या. विरोधी पक्षनेते गेले पण पूर ओसरल्यावर गेले, असा निशाणाही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांवर साधला. शेतकऱ्यांसाठी जे करायचे ते मोठे निर्णय आपण घेतले. ऑगस्ट 2020 ला एनडीआरएफच्या निकशानुसार त्यावेळच्या महाविकासआघाडी सरकारने निर्णय घेतला होता. दोन हेक्टरची मर्यादा होती, तिच्या दुप्पटीपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना केली आहे. शेतकऱ्यांच्या मागे सरकार उभे आहे. केंद्रीय पथक 1 ते 4 ऑगस्टदरम्यान पाहणी करून गेलंय, अशी माहितीही शिंदेंनी दिली. 'अजून सुरुवातही झाली नाहीय आणि तुम्हाला एवढी मस्ती आली?', अजित पवार भडकले 'सरकार अल्पमतात आल्यानंतर राज्यपालांचं पत्र आल्यानंतर शेवटच्या दोन कॅबिनेट मीटिंगमध्ये त्यांनी चारशे पाचशे निर्णय घेतले. ते सर्व घाई गडबडीत घेतलेले निर्णय होते. माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर निर्णय घेण्यात आले. आम्ही आकसापोटी निर्णयांना स्थगिती दिलेली नाही. अत्यावश्यक सेवा संदर्भातील निर्णय कायम ठेवले,' असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मी राज्यात ज्या ठिकाणी जातोय तिथले नागरिक स्वत: आमच्याशी बोलत आहेत. आम्हाला साथ देत आहेत. चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे. अजित पवारांनी जे सांगितलं ते वस्तूनिष्ठ नाही. कायदा सर्वांना सारखा असतो. मागच्या अडीच वर्षांमध्ये शिवसैनिकांना मोक्का लावला, त्यांना धमक्या देण्याचं काम सुरू होतं. सगळ्या प्रकरणांचा तपास करण्यात येईल, कायद्यासमोर सगळे समान आहेत आम्ही कुणाचंही समर्थन करत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
First published:

Tags: Ajit pawar, BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shivsena

पुढील बातम्या