अनिल पाटील पणजी 30 मे : राज्यात उन्हाचा कहर वाढला असताना पावसाची शक्यता परत लांबल्याने सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यासमोरच्या चिंता वाढणार आहेत. 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा 8 जून पर्यंत येईल आणि तो राज्यात दाखल होण्यासाठी 15 ते 17 जून उजाडेल असा दावा राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलाय.
मान्सूनची आतुरता सर्वाना लागली असताना पावसाबाबत चिंता करायला लावणारी माहिती पुढ आलीय. पाऊस सक्रिय होण्यासाठी आवश्यक परिस्थिती हिंदी महासागरात निर्माण झालेली नाही. पाऊस कधी येणार आणि याबाबत वेगवेगळी माहिती पुढं येतीय . याबाबत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि मान्सूनतज्ञ डॉ. एम.आर.रमेशकुमार यांनी दिलेली माहिती चिंता वाढविणारी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा पाऊस कमालीचा लांबणार आहे. सगळी परिस्थिती योग्य राहिली तर 15 जून पर्यंत पाऊस गोवा आणि महाराष्ट्रात येऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली.
मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणारी स्थिती समुद्रात नाही. ढग निर्मितीसाठीची आद्रता आणि वारा खोल समुद्रात नाही. त्यामुळे मान्सून खूपच लांबणार आहे याचा परिणाम शेती व्यवसायावर होणार असून आणखी काही दिवस सर्वांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
पाऊस लांबला तरी यंदाचा पाऊस समाधानकारक असेल आणि त्यावर अल निनोचा कोणताच परिणाम असणार नाही अशही माहितीही डॉ. रमेशकुमार यांनी दिली.
असं असतं पावसाचं वेळापत्रक
सरासरी १ जूनला केरळात दाखल
८ जून पर्यंत राज्यात दाखल
यंदा ८ जूनला केरळमध्ये येणार
राज्यात १५ ते १७ जून उजाडणार
मान्सूनचा इतिहास
१८ जून १९७२ ला सर्वांत उशिरा - मोठा दुष्काळ
११ मे १९१८ ला सर्वात लवकर मान्सून दाखल
सरासरी ४५ दिवसात संपूर्ण देश व्यापणारा मान्सून २०१३ मध्ये १६ दिवसात साऱ्या देशात सक्रिय झाला होता
२००२ मध्ये देशभर सक्रिय होण्यासाठी ७६ दिवस लागले होते.