मान्सूनला लेटमार्क, महाराष्ट्रात उशिरा येणार !

मान्सूनला लेटमार्क, महाराष्ट्रात उशिरा येणार !

सात जूनला महाराष्ट्र आणि मुंबईत येणार असे संकेत देणारा मान्सूनला आता उशीर होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

05 जून : येणार येणार असं सांगणारा मान्सून अजून केरळमध्येच रेंगाळलाय. सात जूनला महाराष्ट्र आणि मुंबईत येणार असे संकेत देणारा मान्सूनला आता उशीर होण्याची शक्यता आहे.

यंदा वेळेवर येण्याचा वायदा देणारा मान्सून उशिरा येण्याची चिन्हं आहेत. अंदमान आणि तिथून केरळात आलेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून तिथंच रमलाय. मान्सूनचा पाय अजूनही कोचीतून निघालेला नाही. राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. पण तो पाऊस मान्सूनपूर्व असल्याचं हवामान खात्यानं म्हटलंय.

येत्या दोन ते तीन दिवसांत बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे. पण महाराष्ट्रात मान्सून येण्यासाठी 8 जून नंतरच स्थिती अनुकूल असेल असं सांगण्यात येतंय.

महाराष्ट्रात यंदा सात जून अगोदर येण्याचा वायदा मान्सूननं दिला होता. पण तो त्याला पाळता आलेला नाही. आता तो नव्या वायद्याच्या तारखेला तरी यावा अशी अपेक्षा आहे.

First published: June 5, 2017, 7:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading