अरबी समुद्रात धडकणार चक्रीवादळ, मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

अरबी समुद्रात धडकणार चक्रीवादळ, मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस

मुंबईसह महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा अतिउष्णतेमुळे पडलेला वळवाचा पाऊस आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जून : मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जूनला अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काल पडलेला पाऊस हा वळवाचा पाऊस होता. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे.

'वायू' असं या चक्रीवादळाचं नाव आहे. या वादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला कोणताही धोका नसला तरी त्यामुळे कोकणात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवस समुद्रात मासेमारांना जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात पडलेला पाऊस हा अतिउष्णतेमुळे पडलेला वळवाचा पाऊस आहे. त्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ सदृष्य परीस्थिती निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला 'वायू' हे नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जात गुजरात सौराष्ट्रच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : Union Budget 2019 : बँकेतून 'इतके' पैसे काढण्यावर लागू शकतो कर

या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह कोकण भागात  चांगला पाऊस पडेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला अती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही अरबी समुद्रात जाऊ नये अशा सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी अवकाळी आलेल्या पावसाने शेतीचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं. तर जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून 14 जून दरम्यान मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. 11 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

VIDEO : अतिउत्साह नडला, मुंबईच्या समुद्रकिनारी अडकली कार

First published: June 10, 2019, 3:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading