राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने, हवामान खात्याचा अंदाज

राज्यात मान्सूनचे आगमन उशिराने, हवामान खात्याचा अंदाज

'यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे.'

  • Share this:

मुंबई, २६ मे : राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. मॉन्सूनचे आगमन अंदमान भागात झाले असले तरी त्याची पुढची वाटचाल हळू राहणार आहे. यामुळे केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी मान्सूनच्या आगमनाची शक्यता कमी आहे. राज्यात किमान ८ जूनपर्यंत तरी मान्सून-पूर्वीच्या पावसाची शक्यता नाही. ३१ मे पर्यंत तापमानात बदल अपेक्षित नसल्यामुळे उन्हाचा चटका कायम राहील, परंतु १ जूनपासून पूर्व-विदर्भ वगळता इतर भागातील कमाल तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये. त्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करावी आणि हवामानाच्या सल्ल्यानुसार पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.

मान्सून अंदमानात दाखल

अखेर मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. 18 ते 19 मे रोजीपर्यंत मान्सून हा अंदमानात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार आज पावसानं अंदमानात हजेरी लावली आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान निकोबार बेटं,  अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. यंदाचा मान्सून हा उशिरा दाखल होणार अशी माहिती स्कायमेटकडून वर्तवण्यात आली होती. तर अंदमानमध्ये 18-19 मेपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. पण यावेळी मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं आहे. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आलं होतं.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा अल नीनो वादळाचा प्रभाव कमी असणार आहे. जर त्याचा प्रभाव असाच कमी राहिला तर शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून आनंदाचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 10:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading