आला आला वारा,संगी पावसाच्या धारा

आला आला वारा,संगी पावसाच्या धारा

ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. वेळेअगोदर येण्याचा सांगावा पाठवणाऱ्या मान्सूननं केरळच्या कोच्चीत मुक्काम ठोकला होता.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 09 जानेवारी : तो आलाय. तो बरसतोय. तो आनंद घेऊन आलाय. हो मान्सून आलाय.ज्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती तो मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. वेळेअगोदर येण्याचा सांगावा पाठवणाऱ्या मान्सूननं केरळच्या कोच्चीत मुक्काम ठोकला होता. त्यावेळी तो थोडा उशीरा येणार असा अंदाज होता. पण आता तो वेळेवर आलाय. कोकण किनारपट्टीवर त्यानं हजेरी लावलीये. कोकणातल्या वेंगुर्ल्यात मान्सून आल्याचं वेधशाळेनं जाहीर केलंय.

कोकणात दाखल झालेला मान्सून बहात्तर तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून टाकेल.मध्य महाराष्ट्रासह राज्यातल्या अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवलग मान्सून येत्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज आहे.

मान्सूननं वर्दी दिल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय. महाराष्ट्रात तर मान्सून शंभर टक्क्यांच्या आसपास बरसणार आहे. हवामान खात्याचं हे भाकीत तंतोतंत खरं होऊ दे आणि शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच स्थैर्य लाभू दे अशीच अपेक्षा

First published: June 9, 2017, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading