मुंबईकरांनो सावधान! पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईकरांनो सावधान!  पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची शक्यता, 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर: आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकर आधीच हैराण आहेत. 5 दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली होती. रविवारी (08 ऑगस्ट)रोजी पहाटेपासून मुंबई, उपनगर, कोकण गोव्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबई, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे उपनगरांतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती आहे.

गडचिरोलीत तिसऱ्या दिवशीही पूरस्थिती कायम आहे जवळपास 70 टक्के भामरागड पाण्याखाली गेल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फुटावर जाऊन पोहोचली आहे. राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून 11 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. मुसळधार पाऊस आणि राधानगरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोव्याच्या घाटमाथ्यावर गेले अनेक दिवस पडणाऱ्या संततधार पावसानं या भागातून जाणारे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गोव्याचा घाट माथ्यावरचा संपर्क तुटला आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदेमंत्री राम जेठमलानी यांचं निधन

SPECIAL REPORT : कोल्हापूरकरांनो, सावधान! पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर

Published by: Kranti Kanetkar
First published: September 8, 2019, 9:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading