पुढचे 10 दिवस पावसाचे, या कारणामुळे रेंगाळतोय मॉन्सून

पुढचे 10 दिवस पावसाचे, या कारणामुळे रेंगाळतोय मॉन्सून

यावर्षी मान्सून लांबल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस सुरूच राहणार आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा 33 टक्के कमी पाऊस झाला पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांत जोरदार पाऊस झाला.

  • Share this:

मुंबई, 1 ऑक्टोबर : कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये पुढच्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पाऊस होऊ शकतो.

परतीच्या महिन्यातच कोसळला

यावर्षी मान्सून लांबल्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस सुरूच राहणार आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा 33 टक्के कमी पाऊस झाला पण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांत जोरदार पाऊस झाला.

सप्टेंबरमध्ये तर गेल्या 102 वर्षांतला सर्वाधिक पाऊस पडला आहे. वाऱ्यांच्या येण्याजाण्याची दिशा आणि वेळ बदलल्यामुळे यावर्षी मान्सूनचा पॅटर्न बदलला, त्यामुळे ज्या सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते त्याच महिन्यात जास्त पाऊस कोसळला, असं तज्ज्ञांंचं म्हणणं आहे.

(हेही वाचा : खूशखबर! सरकार इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याची शक्यता)

Loading...

सरासरीपेक्षा जास्त पाऊस

देशभरात यावर्षी सरासरीच्या 110 टक्के पाऊस झाला आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराची समस्या उद्भवली. पुणे, सांगली, कोल्हापूर या भागांत जोरदार पाऊस झाला. पुण्यामध्ये अवघ्या 3 तासांत 112 मिलीमीटर पाऊस पडला.

बिहारमध्ये अतिवृष्टी

बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत 40 जणांचा बळी गेलाय. तब्बल 758 गावांना पुराचा फटका बसलाय. 17 ठिकाणी पुनर्वसन केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. पाटण्यात आत्तापर्यंत 342 मिमी पाऊस झालाय. पाटणा आणि परिसरात मदतकार्य पोहोचवण्यात लष्कराचीही मदत घेतली जात आहे.

========================================================================================

VIDEO : उदयनराजेंविरोधात लढण्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी अखेर केला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...