मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Good News : यंदा मे महिन्यातच बरसणार Monsoon च्या सरी, उकाड्यातून लवकरच मिळणार दिलासा

Good News : यंदा मे महिन्यातच बरसणार Monsoon च्या सरी, उकाड्यातून लवकरच मिळणार दिलासा

Monsoon Forecast  हवामान विभागानं यंदा 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तौत्के चक्रीवादळाचा हा सकारात्मक परिणाम झाला असून, मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून लवकर दाखल होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 मे : उन्हाचा तडाखा वाढलेला असल्यानं सगळेच उकाड्यानं हैराण झालेले आहे. मात्र आता लवकरच उकाड्यातून दिलासा मिळणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदा मे महिन्यातच मान्सून केरळमध्ये (Monsoon in Kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं (IMD) यंदा मान्सून 31 मे रोजी दाखल होणार असल्याचा अंदाज (Monsoon Forecast) वर्तवला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातही लवकर पावसाचं आगमन होऊन उकाड्यापासूनही लवकर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तौत्के चक्रीवादळामुळं मान्सून लवकर दाखल होणार असल्याची माहिती आहे.

साधारणपणे दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होत असतो. मात्र यंदा तो जवळपास आठवडाभर आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं यंदा 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तौत्के चक्रीवादळाचा हा सकारात्मक परिणाम झाला असून, मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून लवकर दाखल होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठीदेखिल ही आनंदाची अशी बातमी या माध्यमातून आली आहे. दर वर्षीच्या सरासरीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांत राज्यात मान्सून दाखल होत असतो. त्यामुळं यंदाही 8 ते 10 तारखेदरम्यान तळकोकणात मान्सून दाखल होईल. त्यानंतर 4-5 दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवमान खात्यानं यापूर्वी वर्तवलेला अंदाज बऱ्यापैकी यशस्वी ठरला आहे. यापूर्वीचा 5 वर्षांचा अंदाज ते पाहायला मिळालं आहे. त्यामुळं यंदाही अंदाज योग्य ठरला तर मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीलाच मान्सूनच्या या सरी बरसतील. प्रत्यक्षात हवामान विभागान वर्तवलेल्या अंदाजाच्या 4 दिवस मागे पुढंही मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता असते. पण 2020 वगळता यापूर्वी एका दिवसाचाच फरक पाहायला मिळाला आहे. 2017 आणि 2018 मध्ये तर अंदाज वर्तवला त्याच तारखेला मान्सून दाखल झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

हवामान विभागानं यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळं नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळं काहीशी चांगली राहिली आहे. त्यामुळं जर शेतकरी सुखात राहिला तर अशा मोठ्या संकटावरही आपण मात करू शकतो.

First published:

Tags: IMD FORECAST, Monsoon, Rain, Weather forecast