मुंबई, 20 जून : सर्वांची नजर लागून राहिलेला मान्सून अखेर तळ कोकणात दाखल झाला आहे. तळ कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सूनला सुरूवात झाली आहे. राज्यात देखील मान्सूनला वातावरण अनुकूल असून येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून राज्याच्या इतर भागातही सक्रीय होणार आहे. 13 ते 14 जून दरम्यान राज्यात मान्सूनचं आगमन होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. पण, वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनचं आगमन लांबलं. अखेर तळ कोकणात मान्सूनचं आगमन झालं आहे. येत्या 48 तासामध्ये मान्सून उर्वरित राज्यात देखील दाखल होईल.
राज्यात भीषण पाणी टंचाई
राज्याला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणांनी तळ गाठला असून नदी- नाले देखील कोरडे ठाक पडले आहेत. मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे. जनावरं चारा छावण्यांमध्ये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागून राहिले आहेत.
राज्यात पाणीबाणी; आता सारी मदार मान्सूनवर
‘वायू’चा परिणाम
दरम्यान, 7 जून रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून 14 ते 15 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता होती. पण, वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या स्थितीवर परिणाम झाला. त्यामुळे उशिरानं मान्सून राज्यात दाखल झाला आहे.
रोहित पवारांनंतर विखेही ठरणार राम शिंदेंसाठी डोकेदुखी?
कोकणात पेरणीला सुरूवात
कोकणात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावल्याचं पाहायाला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी भार पेरणी देखील केली आहे. काही भागांमध्ये नदी, नाल्यांना पूर आल्याचं चित्र देखील आहे. गेल्यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसाचा परिणाम हा कोकणात देखील जाणवला होता. पाणी साठ्यांनी तळ गाठल्याचं चित्र कोकणात देखील पाहायाला मिळालं होतं.
VIDEO: भररस्त्यात बैलांच्या झुंजीचा थरार; नागरिक हैराण