मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Monkey Attack : माकडाचा पोलीस ठाण्यात हल्ला, महिलेपासून बाळ हिसकावण्याचा प्रयत्न अन्...

Monkey Attack : माकडाचा पोलीस ठाण्यात हल्ला, महिलेपासून बाळ हिसकावण्याचा प्रयत्न अन्...

कसेबसे पोलीस कर्मचारी व इतरांनी माकडाला हुसकावून लावले.

कसेबसे पोलीस कर्मचारी व इतरांनी माकडाला हुसकावून लावले.

कसेबसे पोलीस कर्मचारी व इतरांनी माकडाला हुसकावून लावले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  News18 Desk

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 26 सप्टेंबर : ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिळ डायघर पोलीस ठाण्यात माकडाने चक्क मुलाला आईच्या कुशीत हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत बालक जखमी झाले आहे. शिळ डायघर पोलीस ठाण्यात एका महिलेची तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. याच वेळी हा भयानक प्रकार घडला.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलीस ठाण्यात ही महिला असता याचवेळी एका माकडाने येऊन महिलेच्या कुशीतील 1 महिन्याचे बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, यादरम्यान महिलेने बाळाला पकडले, यामुळे माकड मुलाला हिसकावून घेऊ शकले नाही. मात्र, मूल जखमी झाले आहे.

यानंतर कसेबसे पोलीस कर्मचारी व इतरांनी माकडाला हुसकावून लावले. तसेच यानंतर जखमी बालकाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. यासोबतच शिळ डायघर पोलिसांनी वनविभागाला याची माहिती दिली. यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून या माकडाला आपल्या सोबत नेले.

आईने बालकाला वाचविले -

स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रविवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती, त्यावेळी तिच्यासोबत हा प्रकार घडला. या अधिकाऱ्याने सांगितले की, माकड अचानक पोलीस ठाण्यात घुसले आणि महिलेकडून मुलाला हिसकावून घेण्याचा या माकडाने प्रयत्न केला, मात्र, महिलेने मुलाला घट्ट पकडून त्याला वाचवले.

हेही वाचा - सर्वांच्या डोळ्यांसमोर विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा Video

तर महिलेने सांगितले की, तिने या माकडाला पाहिल्यानंतर त्याला तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी त्याने थेट बाळालाच घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या झटापटीत या बाळाला खूप त्रास झाला. तसेच हे बाळ जखमीही झाले. नंतर महिलेने तातडीने या बाळाला रुग्णालयात नेले. त्याच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

First published:

Tags: Thane