चाळीसगावमध्ये अंत्ययात्रेला वानराची उपस्थिती

चाळीसगावमध्ये अंत्ययात्रेला वानराची उपस्थिती

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, चाळीसगाव,04 आॅगस्ट : चाळीसगाव तालुक्यात एका व्यक्तीच्या अंत्ययात्रेला एका वानराने हजेरी लावल्याने तालुक्यात चर्चा रंगली आहे. शेतकरी सुखदेव धर्मा रोकडे या प्रगतशील शेतकऱ्याचं वृद्धापकाळने निधन झालं. सुखदेव यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू करण्यात आली. या वेळी सुखदेव यांचं पार्थिव तिरडीवर ठेवण्यात आलं त्यावेळी  या पार्थिवाजवळ एक माकड आलं.

काहींची घाबरगुंडी उडाली . पण कुणालाही त्रास न देता माकड पार्थिवाजवळ बसून राहिलं. पार्थिवाला शेवटची आरती केली जाते. ही आरती संपेपर्यंत हे माकड जागेवरून हललं नाही. आरती संपताच माकड तेथून निघून गेलं. या माकडाने अंत्ययात्रेत लावलेली हजेरी तालुक्यात चर्चेचा विषय बनलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2017 02:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading