मोनिका किरणापुरेच्या मारेकऱ्यांना जन्मठेप कायम

मोनिका किरणापुरेच्या मारेकऱ्यांना जन्मठेप कायम

नागपूरमधल्या मोनिका किरणापुरे खून प्रकरणात सर्व 4 दोषींची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे.

  • Share this:

18 आॅगस्ट : नागपूरमधल्या मोनिका किरणापुरे खून प्रकरणात सर्व 4 दोषींची जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे. सेशन्स कोर्टाने सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती हायकोर्टाने कायम ठेवली.

नागपूरमध्ये 11 मार्च 2011 च्या मोनिका किरणापुरे हत्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. कुणाल जयस्वाल, श्रीकांत सोनेकर, उमेश मराठे, प्रदीप सहारे या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच मुख्य आरोपी कुणाल जयस्वाल याला पाच लाख रुपये दंड तर इतर तीन जणांना पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता.

नागपूरच्या नंदनवन परिसरात केडीके इंजिनिअरींग कॉलेजची विद्यार्थीनी मोनिका किरणापुरे हीची 11 मार्च 2011 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणातला मुख्य सुत्रधार कुणाल जयस्वाल आपला मित्र प्रदीप सहारे याच्या मदतीनं केडीके कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आपल्या प्रेयसीच्या खुनाचा कट रचला होता आणि भाडोत्री गुंड श्रीकांत सोनेकर, उमेश मराठे यांना सुपारी दिली होती. आरोपींनी मोनिकाला कुणालची प्रेयसी समजून धारदार आणि तीक्ष्ण शस्त्रानी भोसकून तिची हत्या केली होती.

First published: August 18, 2017, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading