• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडीत मॉन्जिनीस केक कारखान्याची इमारत कोसळली, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

भिवंडीत मॉन्जिनीस केक कारखान्याची इमारत कोसळली, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

सुदैवाने पहाटे कामगारांची सुट्टी झाल्याने सर्व कामगार हे बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

  • Share this:
भिवंडी, 30 ऑक्टोबर : भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील श्रीराम कम्पाऊंडमधील मॉन्जिनीस केक कारखान्याची (monginis cake factory bhiwandi) दोन मजली इमारत कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने कामगारांना सुट्टी झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. दापोडा इथं श्रीराम कम्पाऊंडमध्ये मॉन्जिनीस केकचा कारखाना आहे. या कारखान्यातून मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात केक आणि बेकरीचे पदार्थ पाठवले जात असतात.  आज पहाटेच्या सुमारास मॉन्जिनीस केक कारखान्यात दुर्घटना घडली. दोन मजली असलेल्या या कारखान्याचा पहिला माळा हा कोसळला आहे. पहिला माळा कोसळल्यामुळे खालच्या माळ्यावर अतिरिक्त ताण पडला त्यामुळे खालचा मजल्याची खांब तुटून गेली. धोनी सगळ्यात सन्मानित, तर टीम इंडियाचा हा क्रिकेटपटू सर्वाधिक वादग्रस्त या  कारखान्यात एक ते दोन टनाचे दहा ते बारा केक बनवण्याचे ओव्हन आहे. सुदैवाने पहाटे कामगारांची सुट्टी झाल्याने सर्व कामगार हे बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, या दुर्घटनेत तीन कामगार कारखान्यात अडकले होते, त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले  आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. भिवंडी पोलीस पथक सुद्धा घटनास्थळी पोहचले आहे. खण साडी आणि खण ड्रेस; मराठमोठ्या अभिनेत्रीचे PHOTO पाहून म्हणाल लय भारी! महत्वाची बाब म्हणजे, एमएमआरडीएकडे राईस मिलची परवानगी असताना  दापोडा ग्रामपंचायतीने बेकरीची परवानगी दिल्याने अनधिकृत मॉन्जिनीस केक कारखाना  असल्याचे समोर आले आहे.
Published by:sachin Salve
First published: