एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने पैसे चोरणारे भामटे गजाआड

एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने पैसे चोरणारे भामटे गजाआड

पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून पैसे चोरताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

  • Share this:

28 आॅक्टोबर : एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने पैसे चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून पैसे चोरताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

दोघांनी आतापर्यंत जवळपास अशा प्रकारे 40 लोकांना लुटले असल्याचे माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. आकाश उत्तम वैराट आणि राज अंजनी बानोले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. एटीएममधून पैसे काढताना समस्या येणाऱ्या लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचा पिन नंबर चोरून त्यांच्या अकाऊंटमधील सर्व रक्कम चोरून घेत असत.

शहरातल्या विविध एटीएममध्ये त्यांनी आतापर्यंत 40 पेक्षा जास्त लोकांना फसवलं आहे. लोकांच्या एटीएमचा पासवर्ड शिताफीने चोरून रक्कम काढल्यानंतर कॅन्सलचा ऑपशन दाबण्यास विसरले की पुन्हा हाच पिन टाकून लोकांच्या खात्यातून रक्कम चोरून घेत असत. मुख्यत्वे करून जेथे एकापेक्षा अधिक एटीएम आहे तेथे हे दोघेही गर्दीचा फायदा उचलत असत. त्यांनी केलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पोलीस अधिक तपास करीत असून नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 06:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading