मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना समन्स, 16 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना समन्स, 16 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 02 ऑक्टोबर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येतआहे. अनिल देशमुख (Anill deshmukh) यांच्या विरोधात आता महानगर दंडाधिकारी न्यायालयानं (court) समन्स (summons) जारी केलेत. अनिल देशमुख यांना 16 नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मनी लाँड्रिंगप्रकरणी (money laundering case) ईडीने बजावलेल्या समन्सकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आलं, असे निरीक्षण अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलं आहे. त्यानंतर त्यांना समन्स बजावलेत.

मनी लाँड्रिंगप्रकरणी समन्स बजावूनही ईडीच्या चौकशीला (Enforcement directorate) हजर न राहिल्याबद्दल ही कारवाई न्यायालयाकडून सुरु करण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी देशमुख यांच्याविरोधात शुक्रवारी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

हेही वाचा-अमेरिकेत कोरोना मृतांचा आकडा  7 लाखांवर, काय आहे भारतातील स्थिती?

भारतीय दंडसंहिता 174 अंतर्गत न्यायालयानं देशमुख यांच्यावर ही कारवाई सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात केलेल्या अर्जावर न्यायदंडाधिकारी आर. एम. नेर्लीकर यांच्यापुढे सुनावणी होती. ईडीने बजावलेले समन्स आरोपी, त्यांची मुलगी किंवा त्यांच्या वतीने वकिलांनी घेतले.

अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आणि खंडणी वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयकडूनही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ईडीनं याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ईडीनं देशमुख यांना आतापर्यंत पाचवेळा समन्स बजावले आहे. मात्र अनिल देशमुख हे अद्याप एकदाही चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. हे निदर्शनात आल्यानंतर ईडीनं देशमुख यांच्या विरोधात दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

CBI कडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना समन्स

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (State Chief Secretary Sitaram Kunte) आणि पोलीस महासंचालक संजय पांडे (Director General of Police Sanjay Pandey) यांना सीबीआयनं समन्स (summoned by the CBI) बजावले आहेत. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांची सध्या सीबीआय चौकशी सुरु आहे. अनिल देशमुख गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहेत. सीबीआयसोबतच अंमलबजावणी संचालनालयही मनी लाँडरिंगची चौकशी करत आहे.

हेही वाचा- 'ओ हसीना जुल्फोवाली...' Look वर फिदा क्रिकेटरची स्मृतीनं केली 'बोलती बंद'! 

या प्रकरणाची चौकशी करत असताना सीबीआयनं अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशीचाच एक भाग म्हणून सीबीआय सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदवणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. तसंच दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा देखील केली होती. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सीबीआयला विनंती केली आहे की, जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात यावं.

हेही वाचा- Breaking News: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, मुंबईतले पाच जण बेपत्ता

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला. देशमुखांनी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं, असा आरोपही पत्रात करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआय करत आहे. याच तपासाचा भाग म्हणून साक्ष नोंदवण्यासाठी सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहेत.

First published:

Tags: Anil deshmukh