Home /News /maharashtra /

BREAKING : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा, सेनेचे नेतेही रडारवर

BREAKING : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा, सेनेचे नेतेही रडारवर

मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering case) ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे.

    ठाणे, 24 नोव्हेंबर :ठाण्याचे शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik ) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी (Enforcement Directorate (ED) च्या पथकाने छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंगच्या संशयावरून प्रताप सरनाईक यांच्या घरी हे पथक पोहोचले आहे. प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीला प्रताप सरनाईक यांच्यावर संशय आहे. त्यामुळे ठाण्यात 10 ठिकाणी ईडीच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवास्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली. आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरी आणि प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली आहे. या संदर्भात ईडीने कोणतीही नोटीस दिली नसल्याचं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले आहे. सध्या प्रताप सरनाईक हे मुंबई बाहेर आहेत. त्यांच्या मालकीच्या 10 विविध जागांवर या धाडी टाकल्याचं ईडीकडून सांगितलं जात आहे. दिल्लीहून आलेली ईडीची टीम ही कारवाई करत आहे. ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. सरनाईक हे ठाण्यातील ओव्हळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते मीरा-भाईंदर परिसराचे शिवसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत. ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या सोबतच शिवसेनेच्या आणखी एका दिग्गज नेत्याला ईडीने नोटीस बजावल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. (सविस्तर बातमी लवकरच)
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या