Home /News /maharashtra /

श्रीमंत भासवून 40 तरुणींना ओढलं जाळ्यात, कल्याणमधील तरुणाचा कांड वाचून हादराल

श्रीमंत भासवून 40 तरुणींना ओढलं जाळ्यात, कल्याणमधील तरुणाचा कांड वाचून हादराल

Crime in Kalyan: कल्याण येथील रहिवासी असणाऱ्या एका 34 वर्षीय तरुणाने सोशल मीडिया (Social media) आणि मॅट्रीमोनिअल साईटवर (matrimonial site) अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

    कल्याण, 19 जानेवारी: कल्याण (Kalyan) येथील रहिवासी असणाऱ्या एका 34 वर्षीय तरुणाने सोशल मीडिया (Social media) आणि मॅट्रीमोनिअल साईटवर (matrimonial site) अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आरोपीनं प्रत्यक्षात कधीही न भेटता तब्बल 35 ते 40 तरुणींना ऑनलाईन गंडा घातला आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष (Lure of marriage) दाखवून त्यांची लाखोंची फसवणूक (Money fraud) केली आहे. मागील बरीच दिवस शोध घेतल्यानंतर, गुप्त माहितीच्या जोरावर सापळा रचून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrest) आहेत. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. विशाल चव्हाण उर्फ अनुराग असं अटक केलेल्या 34 वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपीनं सोशल मीडिया आणि मॅट्रीमोनिअल साईटच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल 35 ते 40 तरुणींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. आरोपीनं आपण श्रीमंत असल्याचं भासवून प्रत्यक्षात कधीही न भेटता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीने कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. आरोपीनं पीडित तरुणीला मॅट्रीमोनिअल साईटवर लग्नासाठी विचारणा केली होती. त्यासाठी आपण खूप श्रीमंत असल्याचंही त्यानं पीडितेला भासवलं होतं. हेही वाचा-पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी; साताऱ्यात बापलेकाचा भयावह शेवट त्यानंतर त्यानं आपल्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक करायची असल्याचं सांगून पीडितेला अभ्युदय बँकेत सव्वा दोन लाख रुपये भरण्यास सांगितलं होतं. पीडित तरुणीने आरोपीवर विश्वास ठेवून संबंधित बँकेत पैसे भरले. पण त्यानंतर आरोपी विशाल यानं पीडितेशी संपर्क तोडला. विशालने पीडितेशी प्रत्यक्षात एकदाही न भेटता तिला लाखोंचा गंडा घातला आहे. आरोपीनं अशाच प्रकार राज्यभरातील 35 ते 40 तरुणींना फसवलं आहे. हेही वाचा-शौक बडी चीज है! वाळत घातलेले कपडे चोरून जजला आणलं नाकीनऊ, भामटा अखेर जेरबंद या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पण आरोपीनं वापरलेले मोबाईल नंबर, सोशल मीडिया अकाउंट तसेच मॅट्रोमोनियल साइटवर पत्ता खोटा टाकला होता. एवढंच नव्हे तर आरोपीनं मॅट्रीमोनिअल साईटवरील फोटोदेखील भलत्याच तरुणाचा अपलोड केला होता. त्यामुळे आरोपीचा शोध घेणं कठीण बनलं होतं. पण पोलिसांनी विविध तांत्रिक बाबींचा बारकाईने तपास करत आरोपीचा पत्ता शोधून काढला. हेही वाचा-लातुरात तरुणाला जिवंत जाळलं; महिनाभरानं उलगडलं गूढ, भावजय ठरली मृत्यूचं कारण यानंतर पोलिसांनी सापळा रचून कल्याण पूर्वेकडील श्रद्धा महल या इमारतीतून अटक केलं आहे. आरोपी विशाल याने काही तरुणींना प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी शारीरिक संबंध देखील प्रस्थापित केले आहेत. यासोबतच त्याने स्वस्तात आयफोन देण्याच्या नावाखाली 20 ते 25 तरुणांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात शीव, वर्सोवा, नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kalyan

    पुढील बातम्या