मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रस्त्यावर जागोजागी पडले पैसे, पण घाबरून लोकांनी हातही लावला नाही! पालघरमध्ये घडली घटना

रस्त्यावर जागोजागी पडले पैसे, पण घाबरून लोकांनी हातही लावला नाही! पालघरमध्ये घडली घटना

पालघरमधील कुडण या गावात रस्त्यावर अचानक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पडलेले दिसू आले.

पालघरमधील कुडण या गावात रस्त्यावर अचानक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पडलेले दिसू आले.

पालघरमधील कुडण या गावात रस्त्यावर अचानक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पडलेले दिसू आले.

पालघर, 21 एप्रिल : रस्त्यावर जागोजागी पैसे पडले होते...पण तरी कोणीही या पैश्यांना हात लावला नाही...हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही...पण हे घडलं आहे पालघर जिल्ह्यातील एका गावामध्ये...लोकांनी रस्त्यावर पडलेल्या पैशाला हात लावण्याचं कारण आहे कोरोनाची दहशत. कोरोनामुळे आधीच चिंतेचं वातावरण असल्याने काहीही घडले तरी त्यांचे अनेक तर्कवितर्क काढले जातात. असाच काहीसा प्रकार पालघर जिल्ह्यातील कुडण गावात घडला आहे.

पालघरमधील कुडण या गावात रस्त्यावर अचानक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे पडलेले दिसू आले. यामुळे नागरिकांनी हे पैसे उचलण्याऐवजी भीतीमुळे थेट पोलिसांना फोन लावला. त्यानंतर पोलीस या गावात दाखल झाले आणि पोलिसांनी पैसे ताब्यात घेतले आहेत.पालघर जिल्ह्यातील सद्या अफवांना पेव फुटलेले असताना नागरीक अनेक तर्कवितर्क लढवले जात असतात.

सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावर कुडण ग्रामपंचायतीच्या समोरच्या भागात रस्त्यावर 730 रूपये पडलेले येथील लोकांना दिसून आले. पैशाला थुंकी लावून हे पैसे कोणी समाजकंटकांनी टाकले असल्याची अफवा पसरल्याने अनेक लोक रस्त्यावर जमा झाले होते. मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणाहून वाहनांची वरदळ सुरू असते.

हेही वाचा- देशभर गदारोळ झाल्यानंतर पालघरच्या घटनेवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

यामुळे दुचाकीस्वाराच्या खिशातून पैसे पडले असल्याची शक्यता आहे. तारापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी याठिकाणी जावून सुरक्षितपणे पैसे उचलून प्लास्टिक पिशवीमध्ये भरण्यात आले. सोशल मीडियावर पसरल्या जाणाऱ्या अफवांमुळे पालघर जिल्ह्यात अनेक अनुचित प्रकार घडले असल्याने याअगोदर देखील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published:

Tags: Palghar, Palghar district