मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP Mohit Kamboj : मोहीत कंबोज यांच्या निशाण्यावर पुन्हा राष्ट्रवादी म्हणाले NCP Let’s See !, महाविकास आघाडीवर टीका

BJP Mohit Kamboj : मोहीत कंबोज यांच्या निशाण्यावर पुन्हा राष्ट्रवादी म्हणाले NCP Let’s See !, महाविकास आघाडीवर टीका

भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्विट करत चर्चेत असतात. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ते महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत.

भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्विट करत चर्चेत असतात. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ते महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत.

भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्विट करत चर्चेत असतात. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ते महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 30 सप्टेंबर : राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी ट्विट करत चर्चेत असतात. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून ते महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहे. याचबरोबर ते राष्ट्रवादीला विशेष टार्गेट करत आहेत. कंबोज यांच्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस पक्ष आहे, पण अध्यक्ष नाही!, उद्धवजी पक्षाध्यक्ष आहेत पण पक्ष नाही! आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस बघूया! असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे.

महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून मोहीत कंबोज हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांच्यावर ट्वीट करत निशाणा साधला होता. तर राष्ट्रवादीचा एक बडा नेता जेलमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी ट्वीट केले होते. ह्या घटना ताज्या असतानाच मोहीत कंबोज यांनी केलेल्या ट्वीटने पुन्हा चर्चा रंगली आहे. मोहीत कंबोज यांनी आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : 'एक नेता, एक झेंडा, एक मैदान...'; शिंदेंपाठोपाठ ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर

मागच्या काही दिवसांपासून कॉंग्रेस पक्षात अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून रणकंदन सुरू आहे. कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्षपदावरुन पक्षांतर्गतच बंडाळी उफाळून येताना दिसून येत आहे. तर एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वळण मिळत गेले. भाजप–शिंदे गट अशी युती होत महाराष्ट्रात अखेर सत्ता स्थापन करण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं आहे.

दरम्यान दसरा मेळावा आणि शिवसेना पक्षचिन्हावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरु झाला आहे. दसरा मेळावा कोण घेणार यात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली. पालिकेने शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही नाकारल्यानंतर शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर  शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास शिवसेनेला हिरवा कंदील दाखवला.

हे ही वाचा : 'उद्धव ठाकरेंनी केलेल्या 'त्या' गद्दारीचा एकनाथ शिंदेंनी बदला घेतला', चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, काँग्रेस पक्ष आहे, पण अध्यक्ष नाही!, उद्धवजी पक्षाध्यक्ष आहेत पण पक्ष नाही! आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस बघूया! मोहित कंबोज यांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

First published:

Tags: BJP, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)