महाराष्ट्रात घमासान: #मोदी_परत _जा' ट्विटरवर ट्रेण्डिंगला, भाजपनेही दिलं प्रत्युत्तर

महाराष्ट्रात घमासान: #मोदी_परत _जा' ट्विटरवर ट्रेण्डिंगला, भाजपनेही दिलं प्रत्युत्तर

विरोधक आणि सरकारच्या कामगिरीवर नाराज असणाऱ्या नागरिकांनी 'मोदी परत जा' हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड केला आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली. नरेंद्र मोदी यांची आज पहिली सभा पार पडली. मात्र मोदींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवताच राजकारणाला वेग आला आहे. विरोधकांसह सरकारच्या कामगिरीवर नाराज असणाऱ्या नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करत 'मोदी परत जा' हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्ड करण्यात आला आहे.

'केंद्रातील मोदी सरकारमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे. तसंच मोदी सरकारच्या काळात देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. कोल्हापुरातील पूरस्थितीतही मोदी कुठे मदत करताना दिसत नाहीत. त्यानंतर आता विधानसभा निवडणुका आल्यानंतर मात्र ते प्रचाराला आले आहेत,' असा आक्षेप घेत 'मोदी परत जा' हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड केला आहे.

दुसरीकडे, भाजपनेही मोदी परत जा या हॅशटॅगला जोरदार उत्तर देत 'MahaMandateWithModi' हा हॅशटॅग ट्रेण्ड केला आहे. याद्वारे सरकारने केलेली कामं सांगत विरोधकांवर पलटवार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 05:30 PM IST

ताज्या बातम्या