• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ''मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस'', यशोमती ठाकूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

''मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस'', यशोमती ठाकूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

केंद्राचे भाजपा (Bjp Government) सरकार हे हिंदूविरोधी असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

 • Share this:
  नंदुरबार, 08 ऑगस्ट: राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केंद्र सरकार (Central Government) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्राचे भाजपा (Bjp Government) सरकार हे हिंदु विरोधी असल्याचं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रातील भाजप सरकार हिंदूविरोधी आहे. भगवा ही कुणा एका पक्षाची जहागीर नाही. मोदी हे देशाला लागलेले व्हाईट फंगस आहेत, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस आयोजित व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. यावेळी यशोमती ठाकूर आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रम तब्बल दोन तास उशीरा सुरु झाला. नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्तानं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्याकडून नंदुरबारमध्ये व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवर या कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले आहेत. कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून लुटले 16 लाख, निघताना सर्वांचे मोबाईलही फोडले या कार्यक्रमात नंदुरबारमधील शहीद शिरीष कुमार आणि त्याच्या साथीदारांना अभिवादन करण्यात आलं आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला काँग्रेसचे मंत्री तब्बल दोन तास उशीरा पोहोचल्यामुळे स्वातंत्र्यसैनिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
  Published by:Pooja Vichare
  First published: