मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

डाकू प्रमाणे आहे मोदी सरकारचे धोरण, बच्चू कडूंचा जोरदार प्रहार, VIDEO

डाकू प्रमाणे आहे मोदी सरकारचे धोरण, बच्चू कडूंचा जोरदार प्रहार, VIDEO

'साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यामुळे एक तालुका नाहीसा झाला, एवढी ही संख्या आहे'

अमरावती, 08 डिसेंबर :  कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे. 'दर दिवसाला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. एखाद्या डाकू प्रमाने केंद्र सरकारची भूमिका आहे. या केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी लुटला  जात आहे, अशी घणाघाती टीका यावेळी बच्चू कडू यांनी केली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू हे दिल्लीला निघाले आहे. आज बच्चू कडू यांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. पत्रकारांशी बोलत असताना बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. लॉकडाउनच्या काळात न दिसणाऱ्या कोरोना विषाणूमुळे आपण बंद ठेवला. मात्र, आता हा शेतकऱ्यांवर दिसणारा अतिरेक अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांवर अन्याय आहे, जसा एखादा डाकू यावा आणि त्याने पोटात चाकू खुपसून सर्व माल ओरबाडून न्यावा असं हे मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अनेक जण सहभागी झाले आहे.  त्यांना आपला सलाम आहे.  आज भारत बंदला उत्स्फुर्त पाठिंबा मिळाला आहे. यासाठी सर्वांचे आभार आहे, पण ही लढाई आणखी पुढे लढायची आहे, जोपर्यंत विजय मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटायचे नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितले. 'साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यामुळे एक तालुका नाहीसा झाला आहे, त्यामुळे सर्वांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनात सहभागी झाले पाहिजे', असं आवाहनही बच्चू कडू यांनी केले.
First published:

पुढील बातम्या