Home /News /maharashtra /

महाराष्ट्रासाठी केंद्राचा मोठा निर्णय, मुंबई जवळ उभारणार 51 हजार कोटींचा हा प्रकल्प

महाराष्ट्रासाठी केंद्राचा मोठा निर्णय, मुंबई जवळ उभारणार 51 हजार कोटींचा हा प्रकल्प

Bhopal: Prime Minister Narendra Modi and BJP National President Amit Shah (R) wave at their supporters during BJP 'Karyakarta Mahakumbh', in Bhopal, Tuesday, Sept 25, 2018. (PTI Photo) (PTI9_25_2018_000094B)

Bhopal: Prime Minister Narendra Modi and BJP National President Amit Shah (R) wave at their supporters during BJP 'Karyakarta Mahakumbh', in Bhopal, Tuesday, Sept 25, 2018. (PTI Photo) (PTI9_25_2018_000094B)

पुढच्या पाच वर्षात 100 लाख कोटींचं उद्दीष्ट ठेवलं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारचं हे सर्वात मोठं पाऊल आहे.

    नवी दिल्ली 5 फेब्रुवारी : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पुढच्या पाच वर्षात 100 लाख कोटींचं उद्दीष्ट ठेवलं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारचं हे सर्वात मोठं पाऊल आहे. या 100 लाख कोटींमध्ये देशात मोठे पायाभूत प्रकल्प उभे राहणार आहेत. या प्रकल्पांमधूनच ठाणे जिल्ह्यातल्या डहाणूमध्ये मोठं बंदल उभारण्यात येणार असून त्यावर तब्बल 51 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. ते म्हणाले, डहाणूजवळ वाढवण हे नैसर्गिक बंदर आहे. त्याच ठिकाणी 51 हजार कोटी रुपये खर्च करून हे अत्याधुनिक बंदर उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी ही मोठी गुंतवणूक ठरणार असून हजारो लोकांना त्यातून रोजगार मिळणार आहे. सागरी व्यापाराच्या दृष्टीने मुंबई हे देशातलं महत्त्वाचं बंदर आहे. त्याच्या जवळच हे मोठं बंदर उभं राहणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे. उत्पादनात होतेय वाढ नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचं चित्र पाहिलं तर आर्थिक मंदी (Indian Economy) दूर होण्याचे संकेत मिळतायत. रॉयटर्स या न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार नव्या ऑर्डर मिळाल्यामुळे भारतातल्या उत्पादनात (Indian Manufacturing Activity) वेगाने वाढ होते आहे. ही उत्पादनातली वाढ गेल्या 8 वर्षांतली सर्वाधिक वाढ आहे. महाराष्ट्र सरकारला दिलासा, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय निक्केई मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स(Nikkei PMI)नुसार डिसेंबरमधल्या 52.7 च्या तुलनेत मार्केट 55.3 वर पोहोचलं आहे. फेब्रुवारी 2012 नंतरची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, बाजारपेठेत मागणीमध्ये सुधारणा झाल्याचं चित्र दिसतं आहे. सोमवारी जारी झालेल्या मासिक सर्वेक्षणानुसार जानेवारीमध्ये देशातल्या उत्पादनाबद्दलच्या घडामोडी 8 वर्षांत सगळ्यात सर्वोच्च स्थानावर आहेत. यामध्ये उत्पादन आणि रोजगाराबदद्ल प्रगती झाली आहे. हेही वाचा... विमानात 30 हजार फुटांवर प्रेग्नंट महिलेला कळा, एअर होस्टेसने केलंं बाळंतपण

    केजरीवालांची कन्याही राजकीय मैदानात, एका प्रश्नाने विरोधकांची बोलती बंद

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या