दीड कोटीची बोली लागलेल्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; कारण आलं समोर

दीड कोटीची बोली लागलेल्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; कारण आलं समोर

Solapur news: नोव्हेंबर महिन्यात झालेल्या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भरलेल्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात या बकऱ्याला तब्बल दीड करोड रूपयांची बोली लागली होती. एवढी बोली लागूनही संबंधित मेंढपाळाने हा जातिवंत बकरा विकला नव्हता.

  • Share this:

सोलापूर, 03 मे: मागील काही दिवसांपूर्वी मोदी नावाच्या एका बकऱ्याची सोशल मीडियासोबतच इतर ठिकाणी बरीच चर्चा सुरू होती. कारण नोव्हेंबर महिन्यात झालेल्या उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भरलेल्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात या बकऱ्याला तब्बल दीड करोड रूपयांची बोली लागली होती. एवढी बोली लागूनही संबंधित मेंढपाळाने हा जातिवंत बकरा विकला नव्हता. बकऱ्यावरील प्रेमापोटी त्याने तब्बल दीड करोड रुपयांना ठोकर मारली होती. पण गुरुवारी या बकऱ्याचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित मेंढपाळावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचं कोट्यावधी रुपयांचं आर्थिक नुकसानही झालं आहे.

संबंधित मेंढपाळाचं नाव बाबू मिटकरी असून तो सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील चांदुलवाडी या गावातील रहिवासी आहे. तो एक हौशी मेंढपाळ असून त्याच्याकडे विविध जातीच्या अनेक बकऱ्या आणि मेंढ्या आहेत. त्यांच्याजवळ असणाऱ्या मोदी बकऱ्यानं अवघ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पशू बाजारातील ग्राहकांचं लक्ष्य वेधलं होतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व पशूपालकांसाठी हा मोदी बकरा चर्चेचा विषय ठरला होता.

हे ही वाचा- खळबळजनक! सांगलीतील आटपाटीतून 'त्या' 16 लाख रुपये बकऱ्याची चोरी

नोंव्हेंबर महिन्यात कोट्यावधी रुपयांची बोली लागूनही त्यांनी हा बकरा विकला नव्हता. पण गुरुवारी या बकऱ्याचा अचानक न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्यानं मेंढपाळ मिटकरी यांच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे. बाबू मिटकरी हे सध्या आपल्या मेंढ्या घेऊन पंढरपूर परिसरात आहेत. मागील सहा दिवसांपासून त्यांचा हा जातिवंत 'मोदी' बकरा आजारी होता. पंढरपूरातील काही डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले. पण गुरुवारी सकाळी अकरा वाजता या बकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 8:20 AM IST

ताज्या बातम्या