पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बडोद्यात रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बडोद्यात रोड शो

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी गुजरातमध्ये अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं आहे

  • Share this:

बडोदा,23ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बडोद्यात काल रोड शो केला. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी गुजरातमध्ये अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं आहे

गेल्या महिनाभरात मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. घोघा आणि दहेज दरम्यान 615 कोटींच्या रो-रो सेवेचं मोदींनी लोकार्पण केलं. त्यांनी या समुद्री मार्गावरून सफरसुद्धा केली. घोघामध्ये बोलताना मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसनं गुजरातचा विकास रोखल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं. तसंच अर्थव्यवस्था ट्रॅकवर असल्याचंही त्यांनी सांगितलं .

तसंच लवकरच गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहे. राहूल गांधीही गुजरातमध्ये जोरदार प्रचार करत आहे.

First Published: Oct 23, 2017 08:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading