प्रशांत मोहिते, (प्रतिनिधी)
नागपूर, 14 जुलै - नागपूर जिल्ह्यातील केळवादजवळ मॉडेलिंगच्या क्षेत्रात वावरणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. खुशी परिहार (20) असे मृत तरुणीचे नाव असून शनिवारी तिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा नागपूर ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. प्रियकरानेच खुशीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह झुडपात फेकून दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आश्रफ शेख (28) असे आरोपीचे नाव आहे.
खुशी ही हायफाय विचारसरणी होती. ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वावरणारी होती. तिला उच्चभ्रु लोकांमध्ये राहायला आवडत होते. त्यामुळे तिचं असं वागणं तिच्या आई- वडिलांही खटकत होते. आई-वडिलांशी फारसे पटत नसल्याने ती मावशीकडे राहायला गेली होती. मावशीच्या घरी राहात असतानाही ती जास्त वेळ बाहेरच राहत होती. या काळात तिची ओळख आश्रफ शेखशी झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांच काही कारणावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता.
धाब्यावर मद्य प्राशन केले..
खुशी आणि आश्रफमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून वाद होत होता. घटनेच्या दिवशी दोघंही कारमध्ये बसून नागपूरहून मध्यप्रदेशच्या दिशेने हायवेने निघाले होते. दोघांनी रस्त्यात एका धाब्यावर जेवण केलं. मद्यही प्राशन केले. नंतर ते कारमध्ये बसले. दोघांत पुन्हा वाद झाले. आश्रफ आणि खुशीमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात खुशीचा मृत्यू झाला. आश्रफने तिचा मृतदेह हायवेच्या शेजारी असलेल्या झुडपात फेकून दिला, अशी माहिती आश्रफ याने चौकशीत सांगितल्याचे नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे डीवायएसपी संजय जोगदंड यांनी माहिती दिली आहे.
आत्महत्येचा असा VIDEO पाहिला नसेल, कॅमरे सुरू केला आणि...