सावधान! लोकलमधून 3 कोटी किंमतीचे मोबाइल लंपास, 'ही' आहेत धोकादायक 3 स्थानकं

सावधान! लोकलमधून 3 कोटी किंमतीचे मोबाइल लंपास, 'ही' आहेत धोकादायक 3 स्थानकं

जीवघेणी मुंबई लोकल आता खिशालाही परवडेनाशी झाली आहे

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : उशिराने धावणाऱ्या मुंबईत लोकल, खचाखच गर्दी असलेल्या मुंबई लोकल...सर्वसाधारणपणे मुंबई लोकलची ही ओळख. ही जीवघेणी लोकल मुंबईकरांचा घाम गाळते. याबरोबर मुंबई लोकल आता खिसाही रिकामा करणारी दिसत आहे. मुंबई उपनगरीय लोकलमधून दिवसाला तब्बल 66 मोबाइलची चोरी होत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. उपनगरीय लोकल या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून 350 किमीपर्यंत म्हणजेच खोपोली, कसारा आणि CSMT  ते पनवेल (हार्बर लाइन), चर्चगेट ते डहाणू (पश्चिम रेल्वे) पसरलेल्या आहेत. तब्बल 80 लाख लोक मुंबई उपनगरीय लोकलमधून दररोज प्रवास करतात. गेल्या वर्षभरात GRP पोलीस स्थानकात 24,010 मोबाइल चोरीच्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. 2018 मध्ये 32,476 प्रकरणांची म्हणजे दिवसाला 88 मोबाइल चोरीच्या घटना घडतात. 2019 मध्ये चोरीला झालेल्या मोबाइलची किंमत सुमारे 3 कोटी इतकी आहे. तर 2018 मध्ये चोरीला झालेल्या मोबाइलची किंमत 3 लाख 9 हजार आहे.

कोणत्या स्थानकांवर मोबाइल चोरीचे प्रमाण सर्वाधिक

कुर्ला, ठाणे आणि बोरीवली स्थानकावर सर्वाधिक मोबाइल चोरीची नोंद करण्यात आली आहे. अनेकदा गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरी केली जाते शिवाय लोकलच्या दारावर मोबाइल घेऊन उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडून मोबाइल हिसकावून घेऊऩ चोर धूम ठोकतात. यानंतर GRP पोलिसांकडे तक्रार केली जात असली तरी त्याचा फार उपयोग होत असल्याचे दिसून येत नाही. रेल्वे पोलिसांकडील माहितीनुसार चोरीला गेलेले मोबाइल शोधण्यात फार यश येत नसून हे प्रमाण 10 टक्क्यांहून कमी आहे. 2019 मध्ये चोरीला गेलेल्या 24,010 मोबाइलपैकी केवळ 2,319 आणि 2018 मध्ये 32,476 मोबाइल पैकी केवळ 2,517 मोबाइल सापडली आहेत.2019 मध्ये मोबाइल चोरी प्रकरणात 5,724 जणांना पकडण्यात आलं असून यातील 234 जणं अल्पवयीन आहेत.

First published: January 29, 2020, 7:49 AM IST

ताज्या बातम्या