नाशिक, 21 जून- मोबाइलचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. मोरवाडी परिसरात एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला. या स्फोटात घरातील इतर किमती वस्तूही जळाल्या आहेत.
मिळालेली माहिती अशी की, राहुल आव्हाड या तरूणाकडे MI कंपनीचा मोबाइल फोन होता. राहुलने दुपारी मोबाइल चार्जिंगला लावला होता. फोनचा बॅटरी चार्ज होत असताना अचानक त्याचा मोठा स्फोट झाला. राहुलने प्रसंगावधान राखून मोबाइल फोन बाहेर फेकल्याने मोठा अनर्थ टळले. या स्फोटामुळे घरात सर्वत्र धूर पसरला होता. अलिकडे मोबाइल स्फोटाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेच्या द्रुष्टीकोणाने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जेणे करून भविष्यातील संभाव्य धोका टाळता येईल.
खिशात झाला मोबाइलचा स्फोट, थोडक्यात बचावला तरुण
मुंबईच्या साकीनाका खैराणी रोड येथील रॉयल फेब्रिकेशन या कारखान्यात काही दिवसांपूर्वी एका कामगाराच्या खिशातील मोबाइलचा स्फोट झाला होता. ही संपूर्ण घटना या कारखान्यात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होता. 28 फेब्रुवारीला अब्दुल रौफ हा कामगार इतर कामगारांसोबत सकाळी 10 वाजता बसलेला असताना अचानक त्याच्या पॅन्टच्या खिशातील मोबाइलने पेट घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्वरित मोबाईल खिशातून काढून लांब फेकला. सुदैवाने यात त्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, पुन्हा एकदा मोबाइलच्या स्फोटाच्या घटनेने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
VIDEO : सिन्नर घाटात लाखमोलाची मसिर्डीज SUV जळून खाक