Home /News /maharashtra /

बीडमध्ये चाललंय काय? गुन्हेगारांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लाठ्या-काठ्याने मारहाण

बीडमध्ये चाललंय काय? गुन्हेगारांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लाठ्या-काठ्याने मारहाण

पोलीस जसे जसे वस्तीजवळ गेले तसे वस्तीवरील उपस्थित जमावांनी त्यांना पाहताच त्यांच्यावर दगडफेक करायला सुरूवात केली.

पोलीस जसे जसे वस्तीजवळ गेले तसे वस्तीवरील उपस्थित जमावांनी त्यांना पाहताच त्यांच्यावर दगडफेक करायला सुरूवात केली.

पोलीस जसे जसे वस्तीजवळ गेले तसे वस्तीवरील उपस्थित जमावांनी त्यांना पाहताच त्यांच्यावर दगडफेक करायला सुरूवात केली.

बीड, १९ मे - गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी बीड (beed) जिल्ह्याातील पारोडी वस्तीवर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना (beed police) वस्तीवरील जमावाने घेरून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आष्टी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच पोलीस कर्मचारी सकाळी पारोडी वस्तीवर गेले होते. वस्तीवर गेल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी गाडीतून खाली उतरले. तिघे जण पोलीस गाडीत थांबले. आरोपींना आणण्यासाठी गेलेले पोलीस नाईक प्रल्हाद देवडे आणि कॉन्स्टेबल शिवदास केदार हे जसे जसे वस्तीजवळ गेले तसे वस्तीवरील उपस्थित जमावांनी त्यांना पाहताच त्यांच्यावर दगडफेक करायला सुरूवात केली. (फक्त झोपेतील ड्रिम म्हणून निश्चिंत होऊ नका; तुम्हाला भयावह स्वप्न पडतात कारण...) अचानक मोठ्या प्रमाणावर दगड येत असल्याचे पाहून पोलिसांनी बचावात्मक पवित्रा घेतला मात्र समोर जमाव मोठ्या प्रमाणावर होता. तो जमाव काठ्या लाठ्या घेवून पोलिसांच्या दिशेने धावत आला. त्यांना लाठ्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेत दोन पोलिसांना कुंटेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. (नवरा वयाने दुप्पट मोठा म्हणून आईने 15 दिवसांच्या बाळाला सोडले फुटपाथवर, पण...) या हल्या प्रकरणी 7 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर यांनी दिली. मात्र चक्क पोलिसांवरच हल्ला करेपर्यंत आरोपींची मजल जात असेल तर कायद्याचा धाक आहे का असा प्रश्न निर्माण होत असून पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकाचा काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या