'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण

'जय श्री रामची घोषणा द्या', झोमॅटोच्या Delivery Boysना औरंगाबादेत बेदम मारहाण

Jai Shri Ram : 'जय श्री राम' या घोषणेवरून देशभरात राजकारण्यांसह आता सर्वसामान्य जनतादेखील राजकारण करत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 22 जुलै : 'जय श्री राम' या घोषणेवरून देशभरात राजकारण्यांसह आता सर्वसामान्य जनतादेखील राजकारण करत असल्याचं दिसत आहे. या नारेबाजीवरून काही समाजकंटक वातावरण ढवळून काढत असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातही रविवारी (21 जुलै) असाच काहीसा प्रकार घडला आहे. झोमॅटोचे दोन डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात असताना परिसरातील काही जणांनी त्यांना अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. कहर म्हणजे या डिलिव्हरी बॉयना 'जय श्रीराम'चे नारे लावण्यासही जबरदस्ती केली. शहरातील आझाद चौक येथे मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, औरंगाबादेतील आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

(पाहा :आदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट)

(पाहा : धमक्या देऊ नका, नाही तर माज उतरवणार; शिवसेनेच्या मंत्र्याची भाजपला धमकी)

मुस्लिम तरुणाला अडवून केली मारहाण, 'जय श्रीराम' म्हणण्यासही पाडले भाग

औरंगाबादमध्ये गुरुवारी (18 जुलै) देखील असाचा प्रकार घडला होता. कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करत त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली होती. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगराता गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. इम्रान पटेल (वय 28) असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(पाहा :औरंगाबाद मॉब लिंचिंग प्रकरण : होता 'गणेश' म्हणून वाचला 'इम्रान'!)

मिळालेली माहितीनुसार, इम्रान पटेल हा शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो कामावरून घरी निघाला होता. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता त्याला 8 ते 10 तरुणांच्या टोळक्याने अडवले. त्याच्या दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यासही भाग पाडले. इम्रान याने तीन वेळा 'जय श्रीराम' म्हटले. त्यानंतरही टोळक्याने इम्रानला मारहाण केली. या दरम्यान, एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या टोळक्याला पिटाळून लावले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे शहरातील काही भागात तणाव पसरला आहे.

SPECIAL REPORT : मीच पुन्हा परत येतोय, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 07:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading