धुळे,ता,19 जून : राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारी घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. दुर्बळ्या गावात दोन गटातलं भांडण सोडवायला गेलेल्या पोलीसांनाच गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यात कौंटूबीक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना दुर्बळया येथे घडली. या हल्ल्यात डीवायएसपी संदीप गावित, सहायक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पाच ते सात पोलीस जखमी झाले.
दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली होती. त्याच्या नावावरील मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या कारणावरून त्याचे आईवडील आणि सासरच्या मंडळीत वाद सुरू होता. एपीआय खेडकर यांच्या मध्यस्थीनंतर उभय पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचे मान्य केले होते.
मात्र नंतर पुन्हा वाद उफाळल्याने गावात आदिवासी समाज व दोन्ही पक्षांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. बैठक सुरू असतांनाच तेथील महिलांच्या जमावातून पोलिसांवर अचानक दगडफेक सुरू झाली. त्यातून सावरत नाहीत तोच पुरुषांचा जमाव लाठ्याकाठ्या घेऊन पोलिसांवर धावून गेला.
महिला आणि तरूणांनी पोलीसांना अक्षरशः पळवून पळवून मारहाण केली. पोलीसांना अत्यंत अमानुष पध्दतीनं मारहाण करण्यात आलीय. पोलीस गाड्याची तोडफोड आणि महिला कर्मचार्याना धक्काबुक्कीही गावकऱ्यांनी
या हल्ल्यात गावित, खेडकर यांच्या हातावर मुका मार लागला. हवालदार संजय नगराळे, श्यामसिंह वळवी, अनंत पवार हे मारहाणीत जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिला कर्मचारी यमुना परदेशी या गरोदर असून जमावाने ढकलून दिल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे.
हेही वाचा...
जग संपलं, मोदी आता मंगळावर फिरायला जातील : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी
बाळासाहेबांच्या एका आदेशावर शिशिर शिंदेंनी गाजवला होता 'हा' पराक्रम,पण...
शिवसेना पूर्ण सत्तेवर का नाही येऊ शकली याचा शोध घेतोय- मनोहर जोशी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhule, District, Injured, Mob attacks, Police, जखमी, धुळे, पोलीस, भांडण, मारहाण