मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राज' आदेशानंतर मनसेसैनिकाकडून दुकानदारांना खळ्ळ-खट्याक, बसेसही पाडल्या बंद

'राज' आदेशानंतर मनसेसैनिकाकडून दुकानदारांना खळ्ळ-खट्याक, बसेसही पाडल्या बंद

खबरदारी म्हणून राज्य सरकारने गर्दी जमू नये म्हणून जीवनावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं ठेवण्याचे आदेश दिले आहे.

खबरदारी म्हणून राज्य सरकारने गर्दी जमू नये म्हणून जीवनावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं ठेवण्याचे आदेश दिले आहे.

खबरदारी म्हणून राज्य सरकारने गर्दी जमू नये म्हणून जीवनावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं ठेवण्याचे आदेश दिले आहे.

खेड, 19 मार्च : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारने गर्दी जमू नये म्हणून जीवनावश्यक दुकानं वगळता इतर दुकानं ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु, तरीही सुरू दुकानं सुरू असल्यामुळे मनसेनं खळ्ळ-खट्याक आंदोलन करत दुकानं बंद पाडली. विशेष म्हणजे, आजच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या होत्या. खेडमध्ये  मनसेचे सरचिटणीस आणि खेड नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुरू असलेली दुकानं बंद पाडली. शहरात दुकानं पानटपऱ्या, हॉटेल , बंद करण्याचे राज्य सरकारचे आदेश असूनही चालू ठेवल्यामुळे मनसे आक्रमक झाली. तसंच खेड बस स्थानकातून पुणे, पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या बसेस सुरू होत्या. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या बसेस देखील बंद पाडल्या. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तसंच अनेक संशयितांना विलगीकरण विभागामध्ये ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मनसेनं आंदोलन केलं. आजपासून रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व दुकाने, हॉटेल, पानटपऱ्या पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे दिले आदेश आहे. आदेशाचं पालन न केल्यास  गुन्हा दाखल करण्याची पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. दरम्यान,  दापोलीमध्ये  कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील 7 जणांना  क्वारंटाइन कक्षात दाखल करण्यात आले आहे.  आसूद येथील विदेशातून आलेल्या  2 जणांना दाखल करण्यात आलं आहे.  दाभोळ येथे पुन्हा एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे  दापोलीत एकूण 10 रुग्ण प्रतिबंध म्हणून नियंत्रण कक्षात दाखल केले आहे. तसंच, रत्नागिरीतल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात ड्रायव्हर आला होता. त्यालाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यासाठी दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठात  क्वारंटाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी केलं कार्यकर्त्यांना आवाहन मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 49 झाली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोना व्हायरसच्या संकटाला कसं तोंड द्यायचं, याबाबत आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. 'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो...' असं सांगत राज ठाकरे म्हणाले की, आत्तापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहे. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही. -आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे. -आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे. -आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वर्गाशी भेट घालून द्यावी. - आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकार्याचीच असावी. संघर्षाची नव्हे. -आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे. - ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा. -महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे
First published:

पुढील बातम्या