मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मनसे Vs राष्ट्रवादी वाद, अजित पवारांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला, म्हणाले...

मनसे Vs राष्ट्रवादी वाद, अजित पवारांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला, म्हणाले...

 'ज्या लोकांना कुठं काही थारा राहत नाही. ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात'

'ज्या लोकांना कुठं काही थारा राहत नाही. ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात'

'ज्या लोकांना कुठं काही थारा राहत नाही. ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात'

बारामती, 21 ऑगस्ट : 'राष्ट्रवादीच्या (ncp) स्थापनेपासून राज्यात जातीय राजकारण वाढले', अशी टीका मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी केली होती. 'लोकांना कुठं काही थारा राहत नाही. ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात' असं म्हणत राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना टोला लगावला. बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपा संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, 'ज्या लोकांना कुठं काही थारा राहत नाही. ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात. आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे' असे पवार यांनी स्पष्ट केलं. तसंच, पिंपरी चिंचवड कारवाई संदर्भात अजित पवार यांनी सुडबुद्धीने कारवाई केली, हे निव्वळ चुकीचं वक्तव्य आहे. याला, त्याला अर्थ नाही. असं काही झालं तर आम्ही कारवाई केली आणि जर आमच्यावर कारवाई झाली तर त्या संस्थेला मुभा आहे म्हणून लोक कारवाई झाली, असं बोलतात. वास्तविक कुणाचं तरी काहीतरी चुकलेलं आहे. म्हणून एसीबीने कारवाई केली. या कारवाईत राजकीय हेतू नाही. प्रत्येकाने पारदर्शक काम करावं ही जनतेची अपेक्षा असते. कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे एसीबीचं काम आहे' असं अजित पवार म्हणाले. गंगा नदीच्या पुरातून वाचवताना महिलेची Delivery,गोंडस मुलीला दिलं नदीचं नावं 'कुठेतरी पाणी मुरत असेल, भ्रष्टाचार होत असेल तर त्या लोकांना शासन करणं हा एसीबीच्या कामाचा भाग आहे' असंही पवारांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर, राज्यातील नगरपरिषद निवडणुका संदर्भात महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘मला पोटगी नको मुलगा हवा’; निशाने नाकारली करणची मागणी

'प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार चालवत आहे. राज्यस्तरावरच्या आणि इतर महत्त्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत वरीष्ठ पातळीवरचे नेते निर्णय घेतात. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या -त्या जिल्ह्यात अधिकार देणार आहे.  याबाबत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेवून निवडणुकांबाबत दिशा ठरवू असंही त्यांनी सांगितलं.
First published:

Tags: Ajit pawar, Baramati

पुढील बातम्या