परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून मनसेचा सांगलीत राडा

परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून मनसेचा सांगलीत राडा

सांगलीतल्या एमआयडीसीत स्थानिक लोकांनाच काम द्यावं अशी मागणी मनसेनं केली आहे. केवळ मागणी करूनच मनसैनिक थांबले नाही तर त्यांनी काही कामगारांना मारहाणही केली.

  • Share this:

सांगली, 11 ऑक्टोबर: सांगलीच्या कुपवाडमध्ये मनसेनं पुन्हा परप्रांतीय कामगारांच्या मुद्यावर राडेबाजी सुरू केली आहे. कुपवाडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय कामगारांना मारहाण केली आहे. त्याबात मनसेच्या ३ कार्यकर्त्यांना अटक झालीय.

सांगलीतल्या एमआयडीसीत स्थानिक लोकांनाच काम द्यावं अशी मागणी मनसेनं केली आहे. केवळ मागणी करूनच मनसैनिक थांबले नाही तर त्यांनी काही कामगारांना मारहाणही केली. मराठी स्थानिक युवकांना एमआयडीसीमध्ये काम दिलं जावं, ही मागणी करत महाराष्ट्र नवं निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली मध्ये, परप्रांतीय हटाव मोहीम सुरु केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज परप्रांतीय लोकांना चोप दिला आहे. परप्रांतीय तरुणांमुळे वाढलेली गुन्हेगारी कमी व्हावी  यासाठी मनसेचे अांदोलन सुरु केले आहे. कुपवाडमध्ये मनसेने अांदोलन केलं आहे.

ऐंशी टक्के स्थानिक मराठी तरुणांना नोकऱ्या द्याव्यात ही मनसेची मागणी आहे.

First Published: Oct 11, 2017 12:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading