मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बुलेट ट्रेनसाठी शिळगावात जमिनीची मोजणी मनसेनं बंद पाडली

बुलेट ट्रेनसाठी शिळगावात जमिनीची मोजणी मनसेनं बंद पाडली

07 मे : ठाण्याजवळील शिळ गावात बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी मोजणी सुरू होती मात्र ही मोजणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जागा देऊ नका, जर बळजबरी केली तर रूळ उखाडले जातील असा इशारा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बुलेट ट्रेनविरोधात आंदोलन पुकारले आहे. आज ठाण्याबाहेर असलेल्या शिळ गावात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मोजणी सुरू होती. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी शेत जमीन भूसंपादन करण्याकरता शेतीची मोजणी करण्याकरता आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना रोखलं. मनसेनं घटनास्थळी जाऊन घोषणाबाजी करत मोजणीचे काम बंद पाडलं. दरम्यान, एसआरपीची कुमक घटनास्थळी दाखल झाली. मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.
First published:

Tags: Bullet train, MNS, डोंबिवली, बुलेट ट्रेन, मनसे, शिळगाव

पुढील बातम्या