मनसेने आघाडीत येण्यापेक्षा विधानसभा स्वतंत्र लढवावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर

मनसेने आघाडीत येण्यापेक्षा विधानसभा स्वतंत्र लढवावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत येण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून सूर निघाला आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत येण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवावी, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांमधून सूर निघाला आहे. लोकसभेत निवडणूक मनसे लढवली नाही, त्यामुळे आघाडीला कोणताही फायदी झाला नव्हता, असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, राजू शेट्टी आणि राज ठाकरे यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली.

आघाडीत येण्याऐवजी मनसेने स्वतंत्रपणे मुंबई, ठाणे, पुणे नाशिक या या शहरी भागात किमान 50 ते 60 जागा लढवाव्यात, अशी बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटले. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, EVM ला विरोध करणारे राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीत EVM ने मतदान झाल्यास निवडणूक लढवण्यास राज ठाकरे फारसे उत्सूक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. देशपातळीवर EVM विरोधी आंदोलन उभे राहावे, यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील आहे.

राज ठाकरे मंगळवारी कोलकात्यासाठी निघणार आहेत. तिथे त्यांचा 3 दिवस मुक्काम असेल. गुरुवारी ते मुंबईत परत येतील. राज ठाकरे बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना भेटणार आहेत. EVM चा विरोध आणि या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर मोठे आंदोलन उभे करणे, हा भेटीमागचा उद्देश आहे. ममता बनर्जी यांच्याप्रमाणे आणखी प्रमुख राजकीय नेत्यांनाही ते भेटणार आहेत. राज्यात ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही भेटणार आहेत. येत्या 4 ऑगस्टला राज ठाकरे पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचे काय धोरण असेल याची घोषणा करतील.

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

First published: July 29, 2019, 4:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading