Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मास्कबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर मनसेकडून प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मास्कबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर मनसेकडून प्रत्युत्तर

मास्क न घालणाऱ्या नेत्यांबाबतही उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य राज ठाकरे किंवा मनसेच्या नेत्यांसाठी होतं अशी चर्चा आहे. त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 03 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादादरम्यान मांडलेल्या मुद्द्यांवर विविध प्रकारे चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती जनतेसमोर मांडतानाच अनेक नेत्यांची वक्तव्ये आणि कृत्ये यावर अप्रत्यक्षपणे टीकाही केली होती. मास्क न घालणाऱ्या नेत्यांबाबतही उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य राज ठाकरे किंवा मनसेच्या नेत्यांसाठी होतं अशी चर्चा आहे. त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी अनेक नेत्यांचा समाचार घेतला. काही नेते लॉकडाऊनला विरोध करत आहेत तर काही नियम पाळायला तयार नाहीत, असं सांगताना मास्क न वापरणाऱ्यांबाबतही उद्धव यांनी वक्तव्य केलं होतं. काही नेते मी मास्क वापरत नाही असं सांगतात. पण मास्क न वापरणं यात काही शूरपणा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीररित्या आपण मास्क वापरत नसल्याचं सांगितलं होतं. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी हे देखिल मास्क वापरत नाहीत. त्यामुळं राज ठाकरे आणि मनसेकडे उद्धव यांचा निशाणा होता अशी चर्चा आहे. त्यामुळं यावरूनदेखील विविध चर्चा रंगायला सुरुवात झाल्या आहेत. वाचा - नागपूर: कोरोनानं घेतला बापलेकाचा बळी; दोन तासाच्या अंतराने कुटुंबावर दुहेरी आघात उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे किंवा मनसे काय प्रतिक्रिया देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पण राज ठाकरेंची प्रतिक्रिया येण्याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 शी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली. मास्क वापरला तरी कोरोना होत नाही याची खात्री काय. ज्यांनी मास्क वापरला त्यांनाही, कोरोना झालाच ना, त्यामुळं काहीही बोलण्यात अर्थ नसल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली. वाचा - ई-बाइकवरून आली वरात; पाहा जोडप्याचा Eco friendly विवाहसोहळा एकूणच उद्धव ठाकरे यांच्या वक्त्यांनंतर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन लागण्याबाबतही विविध चर्चा होत आहेत. मात्र नेत्यांविषयी आणि खासकरून मास्क विषयीच्या त्यांच्या या वक्तव्यानंतर आता या मुद्द्यांवर कलगीतुरा रंगणार असं दिसत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mask, MNS, Raj Thackeray, Sandeep deshpande, Uddhav thackeray

    पुढील बातम्या