मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कंगनानं दिलेल्या 'ओपन चॅलेंज'वर काय म्हणाला मनसे नेता, केल्या 2 मागण्या

कंगनानं दिलेल्या 'ओपन चॅलेंज'वर काय म्हणाला मनसे नेता, केल्या 2 मागण्या

 कंगनाच्या 'ओपन चॅलेंज'वरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पुन्हा एका ट्वीट केलं आहे.

कंगनाच्या 'ओपन चॅलेंज'वरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पुन्हा एका ट्वीट केलं आहे.

कंगनाच्या 'ओपन चॅलेंज'वरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पुन्हा एका ट्वीट केलं आहे.

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 4 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी (POK) केल्यानं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर मराठी कलाकारांसह सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.

'मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.' असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा...धक्कादायक! कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना, नातेवाईकच करत आहे 'हे' काम

दुसरीकडे, आता कंगनाच्या 'ओपन चॅलेंज'वरून मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पुन्हा एका ट्वीट केलं आहे. कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईलमध्ये स्वागत करण्यात कार्यकर्ते उत्सूक असतील, असं काहींना वाटलं असेल मात्र, कोणाला किती महत्त्व द्यायचं, हे आम्ही राज ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत. प्रत्येक वेळी सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य करून खळबळ उडणवणे, ही मानसिक विकृती आहे. मात्र, या विकृती मागे कोणाचं तरी डोकं आहे, याची आम्हाला कल्पना आहे. एअरपोर्टवर गर्दी गोळा करून स्वत:ला लाईम लाइटमध्ये ठेवण्याचा कंगनाचा प्रयत्न असल्याचं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. तसेच एखाद्या मनोरुग्णालयात कंगनावर उपचार करायला हवा आणि तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशा दोन मागण्याही अमेय खोपकर यांनी केल्या आहेत.

कंगनाचं खुलं आव्हान...

कंगनानं पुढे स्माईल अपलोड करत म्हटलं आहे की 9 सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा असं खुल आव्हान कंगनानं दिलं आहे.

पंगा घेऊ; नकोस, मनसेची धमकी

माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही, असं म्हणत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगनाला सज्जड इशारा दिला आहे.

अमेय खोपकर यांनी ट्वीट करून कंगनावर निशाणा साधला आहे. 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो… कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही', अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी कंगनाला सुनावलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने केलेल्या विधानांमुळे आणि त्यानंतर मुंबईची पाक व्याप्त काश्मीरसोबत केलेली तुलना यामुळे सोशल मीडियावर आणि विविध स्तरामध्ये कंगनावर अनेकांनी नाराजीचा सूर दाखवला. मुंबईविरुद्ध वक्तव्य केल्यानंत संतप्त ट्वीट करत मराठी कलाकारांनी खडेबोल सुनावले.

हेही वाचा....मुंबई-ठाण्यात तापमान वाढणार, 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केली आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर चहुबाजुंनी टीकेची झोड उठली आहे. बॉलिवूडसह मराठी कलाकारही कंगणावर चांगलेच संतापले आहेत. एवढं नाही तर आता कंगणावर सोशल मीडियावरून टीकेचा भडिमार सुरु झाला आहे. 'कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका. #ILoveMumbai', अशा शब्दांत काही कलाकालांनी कंगनाला सुनावलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Kangana ranaut, MNS