Home /News /maharashtra /

'चले जाव' : पाकिस्तानी, बांग्लादेशींना राज ठाकरेंचा इशारा, 9 फेब्रुवारीला काढणार मोर्चा

'चले जाव' : पाकिस्तानी, बांग्लादेशींना राज ठाकरेंचा इशारा, 9 फेब्रुवारीला काढणार मोर्चा

मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेचा झेंडा का बदलला, आपली हिंदुत्वाबद्दलची भूमिका काय हे स्पष्ट केलं. असं असलं तरी त्यांच्या या भाषणाचा मुख्य रोख मोदी सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्यावर होता.

    मुंबई, 23 जानेवारी : मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेचा झेंडा का बदलला, आपली हिंदुत्वाबद्दलची भूमिका काय हे स्पष्ट केलं. असं असलं तरी त्यांच्या या भाषणाचा मुख्य रोख मोदी सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्यावर होता. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात आलेल्या मुस्लिमांच्या विरोधात मनसे भव्य मोर्चा काढणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं. मनसे 9 फेब्रुवारीला हा मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या मुस्लिमांना परत पाठवा, ही आमची मागणी असेल, असंही राज ठाकरे म्हणाले. त्यांनी घुसखोरांना 'चले जाव' चा इशारा दिला आहे. अमित शहा, उद्धवना भेटणार जे मुसलमान देशाशी प्रामाणिक आहेत ते आमचेच आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण सुधारित नागरिकत्व कायद्याच्या बाजूने त्यांनी उघडपणे भूमिका घेतली आणि मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबाच दिला. बेकायदेशीर नागरिकांच्या विरोधात त्यांनी थेट भूमिका घेतली. माझ्याकडची घुसखोरांबदद्लची माहिती घेऊन मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. इतर देशांप्रमाणेच भारतालाही बेकायदेशीररित्या इथे राहणाऱ्यांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी लागेल, असं राज ठाकरे म्हणाले. (हेही वाचा : केम छो ट्रम्प? 'हाउडी मोदी' नंतर ट्रम्प आणि मोदी पुन्हा येणार एका मंचावर) गुढीपाडव्याला समाचार महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा समाचार मी गुढीपाडव्याच्या सभेत घेईन, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय. पण त्याआधी 8 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आणि भाषणाचा शेवट केला. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. राम मंदिर आणि कलम 370 बद्दल मोर्चे काढता आले नाहीत त्याचा राग मुस्लीमधर्मीय या आंदोलनातून काढतायत. या स्थितीत आम्ही इथल्या नागरिकांनाच साथ द्यायला हवी, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. ===================================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: NRC, Raj Thackray

    पुढील बातम्या